Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:04 IST
1 / 8गुलाब जामुनचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय मिठायांची याडी पूर्णच होणार नाही. ही एक अशी मिठाई आहे जी प्रत्येक आनंद, प्रत्येक सण आणि प्रत्येक मेजवानीची शोभा वाढवते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याला हे नाव कसे पडले? कारण त्यात गुलाब किंवा जामूनचा कोणताही अंश नाही. खरं तर, या मिठाईची मुळे भारतात नाहीत तर परदेशात आहेत. चला जाणून घेऊया.2 / 8गुलाब जामुन हे नाव पर्शियन भाषेतून आले आहे. गुलाब या शब्दाचा पर्शियन भाषेत अर्थ 'गुल' अर्थात फूल आणि 'आब' अर्थात पाणी म्हणजे 'गुलाबपाणी' असा होतो.3 / 8जेव्हा खव्याचे गोळे तळले जायचे आणि गुलाबजल असलेल्या गोड सरबतमध्ये बुडवले जायचे तेव्हा त्याचा पहिला भाग 'गुलाब' बनायचा.4 / 8दुसरा भाग, 'जामुन' हा कालांतराने जोडण्यात आला, कारण त्याचा आकार आणि रंग भारतीय फळ 'जामून' सारखाच आहे. अशाप्रकारे, 'गुलाब जामुन' जन्माला आला, एक गोड पदार्थ जो प्रत्येक भारतीय घरातील एक प्रमुख पदार्थ बनला आहे.5 / 8इतिहासकारांच्या मते, या स्वादिष्ट मिष्टान्नाची उत्पत्ती मध्य आशिया आणि इराणमध्ये झाली. त्या देशांतील स्वयंपाकींनी ते तुर्की आणि नंतर भारतात आणले.6 / 8असे म्हटले जाते की ते, प्रथम मुघल सम्राट शाहजहानच्या आचाऱ्याने बनवले होते आणि सम्राटाला ते इतके आवडले की, ते संपूर्ण मुघल साम्राज्याचे आवडते गोड पदार्थ बनले.7 / 8तेव्हापासून याची गोडी भारताच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. या पदार्थाने स्थानिक चव आणि नावे धारण केली आहेत. आज, गुलाब जामुन भारतात अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. बंगालमध्ये, त्याला 'पंटुआ' म्हणतात, राजस्थानमध्ये 'काला जामून' आणि दक्षिण भारतात, त्याला खवा जामून म्हणतात.8 / 8जबलपूरचे मोठे गुलाब जामून देशभर प्रसिद्ध आहेत. गुलाब जामून हे केवळ गोड पदार्थ नाहीत तर ते भारतीय संस्कृती आणि आदरातिथ्याचे प्रतीक बनले आहेत. त्यांची मऊ पोत आणि मधासारखा गोडवा सर्व वयोगटातील लोकांची मने जिंकतो.