दुसऱ्या महायुद्धातील एका आर्मीचं खतरनाक टॉप सीक्रेट, वाचून तुमचंही डोकं जाईल चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:29 IST
1 / 9The Ghost Army Secret : दुसऱ्या महायुद्धात जे जे घडलं त्याचे अनेक किस्से-कहाण्या नेहमीच समोर येत असतात. पण युद्धातील सेनेसंबंधी एक टॉप सीक्रेट युद्धाच्या तब्बल ५ दशकांनंतर समोर आलं होतं. हे सीक्रेट घोस्ट आर्मीबाबत होतं. युद्धात सहभागी झालेल्या आर्मीकडे ना हत्यारं होते, ना त्यांना हत्यारं चालवता येत होती. पण तरीही या सेनेनं दुश्मनांना घाम फोडला होता.2 / 9घोस्ट आर्मीच्या नावाची ही सेना अमेरिकेनं दुश्मनांना चकमा देण्यासाठी युद्धाच्या मैदानात उतरवली होती. या आर्मीला दगाबाज सेना म्हटलं जातं, कारण ही सेना दुश्मनांना केवळ मुर्ख बनवण्यासाठीच समोर आणली गेली होती. 3 / 9सेनेच्या या स्पेशल यूनिटमध्ये ना खरे सैनिक होते, त्यांना कशाचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी फेक होत्या. म्हणजे त्यांच्याकडील टॅंक, गाड्या, हत्यार हे सगळे फुग्यापासून बनवण्यात आले होते. हे केवळ दुश्मनांना घाबरवण्यासाठी होते. यातील लोक सैनिक असण्याचं केवळ नाटक करत होते.4 / 9युद्धाच्या मैदानात या नकली सेनेची अशी काही जरब होती की, त्यांची मोठी संख्या समोर बघून दुश्मन घाबरून माघार घेत होते. जिथे ही हत्यारं तैनात केली जात होती, तिथे दुश्मनांचं सैन्य जातच नव्हतं.5 / 9या घोस्ट आर्मीमध्ये केवळ ११०० सैनिक होते. पण युद्धाच्या मैदानात त्यांचा दरारा असा होती की, दुश्मन घाबरून जायचे. या सेनेकडे सगळ्या प्रकारचे हत्यार होते. पण ते सगळे प्लास्टिकपासून बनवले होते. दुश्मनांना वाटायचं की, यांच्याकडे शक्तीशाली हत्यार आहे.6 / 9अमेरिकेद्वारे युद्धात उतरवण्यात आलेल्या या घोस्ट आर्मीची आयडिया आणि रणनीति इतकी खास होती की, पूर्ण युद्धा दरम्यान त्यांनी दुश्मनांना गुंतवून ठेवलं. प्लानिंग इतकं खास करण्यात आलं होतं की, जर्मन सेना आणि इतर गुप्तचर एजन्सींना हे कधी समजूच शकलं नाही की, घोस्ट आर्मीकडे नकली हत्यार आहेत.7 / 9घोस्ट आर्मीकडे भलेही नकली हत्यार होते, पण जेव्हाही युद्धाची घोषणा होत होती, या आर्मीचे ११०० सैनिक हत्यारांसोबत प्रभावी मार्च करत होते. जे बघून दुश्मन घाबरत होते. 8 / 9घोस्ट आर्मीमध्ये केवळ Allied Army चे सैनिकच नाही तर, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स आणि रशियाच्या वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थीही होते. तर हत्यारं आणि वाहनं कलाकारांनी तयार केल्या होत्या. ही नकली वाहनं आणि हत्यारं खऱ्या हत्यारं आणि वाहनांसारखा आवाज करत होते.9 / 9दुसऱ्या महायुद्धानंतर ५० वर्ष घोस्ट आर्मीला गुप्त ठेवण्यात आलं होतं. नंतर २०१३ मध्ये अमेरिकन Public Broadcasting Service (PBS) टेलिव्हिजननं The Ghost Army नावाचा एक माहितीपट बनवून या रहस्याचा खुलासा केला होता.