Elizabeth Marie Chevalier: कातिलाना अदा! तिचं सौंदर्य पाहून पुरुष घाबरतात, डेट करणं सोडा बोलायचीही होत नाही हिंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 23:21 IST
1 / 5इन्स्टाग्रामवर @marieechev नावाने तब्बल २.९ मिलियन फॉलोअर असलेल्या एलिझाबेथ या तरुणीची अजबच कहाणी आहे. एलिझाबेथ हिला कधी पार्टनर मिळाला नाही असं नाही. सुमारे सहा महिन्यांपूर्वी तिचा ब्रेकअप झाला होता. तेव्हापासून ती एकटीच आहे. कारण कुणीही तरुण तिच्याशी डेट करण्याची हिंमत करत नाही. 2 / 5एलिझाबेथ हिचा सुंदर लुक हेच तिच्या एकटेपणाचे कारण आहे. पाच फूट १० इंच उंच असलेली हेझल कलरच्या डोळ्यांच्या एलिझाबेथचा दावा आहे की, तिची इंटेन्स पर्सनॅलिटी आणि सौंदर्य पाहून पुरुष घाबरतात. ते तिच्याशी योग्य पद्धतीने बोलू शकत नाही. 3 / 5ती सांगते की, तिचे सौंदर्य खूप घायाळ करणारे आहे. जे लोक तिला ओळखतात. ते तिला पाहून तिच्याकडे आकर्षित होतात. तसेच एका ट्रॉफीसारखे तिला दाखवू इच्छितात. मात्र कुणीही तिच्यासोबत राहू इच्छित नाही. 4 / 5 एलिझाबेथने सांगितले की, ती बोल्ड फोटोशूट करते कारण हीच तिची नोकरी आहे. याचा अर्थ तिला जाणून-समजून घेण्याचा प्रयत्न करू नये, असा नाही. मॉडेलने सांगितले की, ती जर सौंदर्याच्या जोरावर जर पैसे कमवत असली तरी ते तिच्यासाठी शाप बनले आहे. कारण लोक केवळ तिचे सौंदर्यच पाहतात. तिचं व्यक्तिमत्त्व पाहत नाहीत. 5 / 5ती सांगते की, तिला तिच्यासाठी एक असा मुलगा हवा आहे जो शांत राहणार असेल. ती सावळ्या आणि सुंदर व्यक्तीला पसंत करेल. तसेच तिच्यासाठी वय किंवा पेशाशी काहीही देणंघेणं नाही आहे. ती एक ईमानदार व्यक्तीच्या शोधात आहे. तो प्रत्येक गोष्ट थेटपणे बोलू शकेल.