शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

....म्हणून साखरपुड्याची अंगठी नेहमी डाव्या हातातील अनामिकेत घालतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 18:27 IST

1 / 8
लग्नाच्या बंधनात अडकण्याआधी साखरपुडा पार पडतो. तुम्हाला माहितच असेल वेगवेगळ्या ठिकाणी साखरपुडा आपापल्या जाती, धर्मानुसार परंपरांना अनुसरून केला जातो.
2 / 8
साखरपुड्यात मुलगा आणि मुलगी एकमेकांना अंगठी घालतात. अंगठी हा केवळ हाताच्या बोटांचे सौंदर्य वाढवणारा एक अलंकार नसून या मागे संरक्षणाची कल्पनाही आहे.
3 / 8
साखरपुड्यात नेहमी डाव्या हातात अंगठी घातली जाते. त्यालाच फिंगर रिंग असं म्हणतात. पण तुम्हाला अंगठी डाव्या हातात घालण्यामागे असलेलं कारण माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.
4 / 8
डाव्या हातात अंगठी घालण्याचा ट्रेण्ड रोमन काळापासून फॉलो केला जात आहे. डाव्या हाताचा थेट हृदयाशी संबंध असतो असं रोमन लोकांचे मत होतं. त्यामुळे डाव्या हातात अंगठी घातल्याने थेट हृदयाशी संबंध जुळतो.
5 / 8
असा समज रोमन लोकांमध्ये होता. यालाच 'vein of love' असं म्हणतात. या परंपरेमागे फॉरेवर लव अशी संपल्पना आहे. कपल्समध्ये आयुष्यभर स्नेह आणि प्रेम राहण्याचं प्रतिक म्हणून डाव्या हातात अंगठी घालतात.
6 / 8
तर पूर्वेकडील म्हणजे चीनमध्ये असा समज राहिला आहे की विवाह हे सर्वात पवित्र बंधन असते. त्यामुळे विरुद्ध हातांतील अनामिकेत अंगठी घातल्याने हे बंधन घट्ट राहते.
7 / 8
कारण दोन हातांचे तळवे एकमेकांना जोडल्यास अनामिका वेगळ्या करणे कठीण असते.
8 / 8
तर काही ठिकाणी डावा हात अपशकून मानलं जातं. म्हणून उजव्या हातात अंगठी घालतात.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप