शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वात शेवटचा रस्ता कुठे आहे? जिथे असतो सहा महिने अंधार आणि सहा महिने प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:24 IST

1 / 6
जगभरातील लोकांना पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणांवर प्रवासाची आवड असते. प्रत्येक देशात, प्रत्येक प्रदेशात काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं असतात. कुणी डोंगरांसाठी प्रसिद्ध, कुणी समुद्रकिनाऱ्यासाठी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जगातील सर्वात शेवटचा रस्ता (The World’s Last Road) कुठे आहे? म्हणजेच असा रस्ता जो एके ठिकाणी संपतो. याच रस्त्याविषयी इंटरेस्टींग माहिती पाहणार आहोत.
2 / 6
जगातील हा शेवटचा रस्ता युरोपातील नॉर्वे या देशात आहे. या रस्त्याला E-69 Highway असं नाव आहे आणि तो जगातील सर्वात शेवटची रस्ता म्हणून ओळखली जातो.
3 / 6
या रस्त्याचा शेवट झाल्यावर तुम्हाला फक्त समुद्र आणि ग्लेशियर दिसतील. पुढे जाण्यासाठी काहीच मार्ग उरत नाही. म्हणजेच इथून पुढे जग संपल्यासारखं वाटतं!
4 / 6
या महामार्गाची लांबी सुमारे १२९ किलोमीटर आहे. हा रस्ता नॉर्वेच्या उत्तरेकडील Nordkapp या ठिकाणी संपतो. हिवाळ्यात येथे अत्यंत थंडी पडते आणि रस्ता पूर्णपणे बर्फाने झाकला जातो.
5 / 6
इतकी थंडी असते की काही काळ या रस्त्यावर एकट्याने प्रवास करण्यास बंदी घालण्यात येते. हवामान क्षणाक्षणाला बदलतं. त्यामुळे ड्रायव्हिंग करणे अत्यंत धोकादायक ठरते.
6 / 6
या रस्त्याबद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे ६ महिन्यांपर्यंत सूर्य उगवत नाही! या काळात संपूर्ण परिसर अंधारात असतो. तर उरलेल्या ६ महिन्यांत जवळपास २४ तास सूर्यप्रकाश असतो म्हणजे रात्रच नाही!
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके