९ महिन्यांपर्यंत प्रेग्नेंट असल्याचे कळलेच नाही, अचानक किचनमध्ये दिला बाळाला जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 16:35 IST
1 / 10एका ब्रिटीश महिलेने तिच्या मुलाला जन्म दिला तोही तिच्या घरातील किचनमध्ये. कारण पूर्ण ९ महिने होऊन गेले तरी तिला माहीत नव्हतं की ती, गर्भवती आहे. तिला तर बाळाला जन्म दिल्यावरही विश्वास बसत नव्हता की, हे तिचं बाळ आहे. त्यामुळे तिने पुढील १२ तास आपल्या बाळाचा चेहराही पाहिला नव्हता. या महिलेचं नाव क्लेअर वीजेमन आहे.2 / 10क्लेअर वीजेमनने सांगितले की, तिला याची अजिबात जाणीव होत नव्हती की, तिच्या शरीरात एक जीव वाढत आहे. ऑक्सफोर्डला राहणारी क्लेअर वीजेमन(२७) ने सांगितले की, तिच्या बॉयफ्रेन्डचं नाव बेन हनी(२४) आहे. 3 / 10ती म्हणाली की, त्या दिवशी ती किचनमध्ये काम करत होती. अचानक तिला हलकी वेदना झाली. अशात तिने आईला मदतीसाठी बोलवलं. तिच्या आईने तिची स्थिती पाहिली तर ती जोरात ओरडली. काही वेळातच तिने एका बाळाला जन्म दिला.4 / 10डेली मेलच्या वृत्तानुसार, क्लेअर वीजेमनने सांगितले की, तिची मासिक पाळी नॉर्मल सुरू होती. इतकंच काय तर तिचं वजनही वाढलं नव्हतं. ती एक सामान्य जीवन जगत होती. पार्टीला जात होती. भरपूर वाईन सेवन करत होती आणि सामान्य त्रासांसाठी सामान्य औषधेही घेत होती.5 / 10पण तिला काही वेळातच बाळ झालं. ५ मिनिटातच तिथं अॅम्बुलन्स आली आणि बाळासह दोघींना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतरही तिला विश्वास बसत नव्हता की, तिने एका बाळाला जन्म दिला.6 / 10क्लेअर वीजेमनच्या बाळाचं वजन साधारण ३.४८ किलो होतं. नंतर बेनने येऊन तिला सांभाळलं. तेव्हा कुठे १२ तासांनंतर तिने तिच्या बाळाचा चेहरा पाहिला. तेव्हा ती त्या बाळाच्या प्रेमात पडली. आज त्यांचा मुलगा २ वर्षांचा झाला आहे. 7 / 10खास बाब ही आहे की, ज्यावेळी या बाळाचा जन्म झाला तेव्हा क्लेअरच्या बॉयफ्रेन्डचं वय २१ वर्षे होतं आणि क्लेअर स्वत: २५ वर्षांची होती. या बाळाचं नाव दोघांनी फिनले ठेवलं.8 / 10मेडिकल टर्ममध्ये याला क्रिप्टिक प्रेग्नेन्सी असं म्हणतात. एकट्या इंग्लंडमधून अशा अनेक केसेस समोर येतात. साधारण ४५० केसेसपैकी एका महिलेला प्रेग्नेन्सीच्या २० महिन्यांपर्यंत म्हणजे अर्ध्या महिन्यांपर्यंत काहीच कळतही नाही. २५०० केसेसपैकी एक केस अशी असते की, ज्यांना डिलिव्हरीपर्यंत प्रेग्नेन्सीचं कळत नाही. क्लेअरची केस याच क्रिप्टिक प्रेग्नेन्सीची आहे.9 / 10क्रिप्टिक प्रेग्नेन्सी ही एक टर्म आहे. ज्यात हार्मोनल किंवा इतर काही समस्येमुळे अनेकदा प्रेग्नेन्सी दरम्यानही मासिक पाळी येते. अशात त्यांना कळत नाही की, नेमकं काय होत आहे. अनेकदा मेनोपॉज दरम्यानही असं होतं. जेव्हा महिला मेनोपॉजमुळे गर्भनिरोधकांचा वापर करत नाही आणि काही न कळताच प्रेग्नेंन्ट महिला सामान्य जीवन जगत राहते.10 / 10क्रिप्टिक प्रेग्नेन्सी ही एक टर्म आहे. ज्यात हार्मोनल किंवा इतर काही समस्येमुळे अनेकदा प्रेग्नेन्सी दरम्यानही मासिक पाळी येते. अशात त्यांना कळत नाही की, नेमकं काय होत आहे. अनेकदा मेनोपॉज दरम्यानही असं होतं. जेव्हा महिला मेनोपॉजमुळे गर्भनिरोधकांचा वापर करत नाही आणि काही न कळताच प्रेग्नेंन्ट महिला सामान्य जीवन जगत राहते.