1 / 10जेव्हा तुम्ही परदेशात पर्यटनाचा आनंद घेण्याचा विचार करत असाल त्यावेळी तुम्हाला इथोपिया देशाचे नाव चूकूनही सूचत नसेल. हे तर सोडाच कितीजणांना हा देश पृथ्वीतलावर आहे याबद्दलही माहित असेल की नाही यावर शंका आहे. या देशाची संस्कृती फार जुनी असून ती पाहिल्यावर इतिहासात गेल्यासारखे वाटते.2 / 10पण तुम्हाला माहित आहे का हा देश जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी काळाने मागे आहे. या देशात सध्या २०१४ हे साल सुरु आहे. याचे कारण म्हणजे या देशाचे कॅलेंडर वेगळे आहे.3 / 10जगात ग्रेग्रियन कॅलेंडर वापरले जाते. मात्र इथे इथोपियन कॅलेंडर वापरले जाते ज्यात १३ महिने असतात. त्यामुळे हा देश इतर देशांच्या ७ वर्ष ३ महिने इतका मागे आहे.4 / 10इथोपियन कॅलेंडरमधील शेवटच्या महिन्याला पैग्युम म्हटले जाते. ज्यात ५ किंवा ६ दिवस असतात. हे अशा दिवसांच्या आठवणीत जोडले गेलेले आहे जे दिवस नेहमीच्या कॅलेंडरच्या दिवसांमध्ये मोजले जात नाहीत.5 / 10यांचे सण, उत्सव, विशेष दिवसही याच कॅलेंडरनुसार आखले जातात. त्यामुळे येथील लोकांनी ११ डिसेंबर २००७ ला शंभर वर्ष पुर्ण झाल्याचा उत्सव केला होता.6 / 10या कॅलेंडरचा शोध रोमन चर्चने इसवी सन ५२५ मध्ये लावला होता. तेव्हापासून हे कॅलेंडर येथे प्रचलित आहे. दरम्यान सध्या येथील काहीजण ग्रेग्रियन कॅलेंडरचाही वापर करतात.7 / 10पर्यटकांना मात्र इथे आल्यावर या कॅलेंडरमुळे असुविधेचा सामना करावा लागतो. त्यामुळे इथोपियन कॅलेंडर आणि ग्रेग्रियन कॅलेंडर याचा मेळ साधुन दिवस आखले जातात.8 / 10इथोपियन लोकं सांगतात की येथे त्यांनी परकीय शक्तींचे राज्य कधीच सहन केले नाही. इटलिने येथे राज्य करण्याचा प्रयत्न केला होता पण इथोपियन सैन्याने तो परतून लावला.9 / 10इथोपियन लोकं सांगतात की येथे त्यांनी परकीय शक्तींचे राज्य कधीच सहन केले नाही. इटलिने येथे राज्य करण्याचा प्रयत्न केला होता पण इथोपियन सैन्याने तो परतून लावला.10 / 10पुरातत्व तज्ज्ञांच्या अनुसार हा भाग अत्यंत इतिहासकालीन असून यात होमो सेपियन जातीच्या मानवाचा सांगाडा सापडला होता.