शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगाला हादरवणारा कोरोना 'या' देशांपर्यंत अजुन पोहोचलाही नाही, जाणून घ्या कोणते आहेत हे देश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:55 IST

1 / 10
कूक आयलंड न्यूझीलंडला लागून असणारा या साऊथ पॅसिफिक देशात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कोरोनाची बातमी आल्यापासूनच या देशानं आपल्या सीमा बंद केल्या होत्या. आता त्या खुल्या करण्यात आल्या आहेत. देशातील 97 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
2 / 10
नॉर्थ कोरिया लागोपाठ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून जगाला धडकी भरवणाऱ्या उत्तर कोरियानंही देशाच्या सीमा बंद ठेवल्यामुळे या देशात कोरोनाचा विषाणू आलेला नाही. केवळ नागरिकच नव्हे, तर अन्न आणि इतर वस्तूंची आयातही उत्तर कोरियानं बंद ठेवली आहे. परिणामी देशाला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला, मात्र तरीही कोरोनाला दूर ठेवण्यात त्यांना यश आलं आहे.
3 / 10
किरीबाटी मध्य पॅरिफिकमधील या देशानंही आपल्या प्रांतात एकाही परकीय नागरिकाला येऊ दिलं नाही. कोरोनाची पहिली बातमी आल्यापासून त्यांनी देशाच्या सीमा बंद केल्याचा परिणाम दिसत असून एकही कोरोना रुग्ण या देशात आढळलेला नाही.
4 / 10
नौरू या देशानं दोन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सीमा आता पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना आता देशात प्रवेश दिला जात आहे. मात्र या देशाच्या एकाही नागरिकाला अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही.
5 / 10
तुवालू या देशानंही आपल्या सीमा बंद केल्याचा परिणाम दिसला. एकही कोरोना रुग्ण न मिळाल्यामुळे एप्रिल २०२१ पासून या देशानं पर्यटकांसाठी सीमा खुल्या केल्या.
6 / 10
पिटकर्न आयलंड्समध्ये अशीच परिस्थिती होती. या देशानं अजूनही आपल्या सीमा बंद ठेवल्या आहेत. ३१ मार्च २०२२ रोजी देशाच्या सीमा उघडल्या जातील, अशी घोषणा या देशानं केली आहे.
7 / 10
कोमोरोस देशात आतापर्यंत कोरोनाची कोणतीही घटना समोर आलेली नाही. हा देश आफ्रिकेत आहे. हा ज्वालामुखी बेटांचा एक गट आहे. लोक या बेटांना परफ्युम आयलँड देखील म्हणतात. कारण येथे सुगंधित झाडे आढळतात.
8 / 10
आफ्रिकेतील लिसोथो देश. हा देश बर्फाच्छादित पर्वत आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी ओळखला जातो. हा देश कोरोना विषाणूपासून देखील लांब आहे.
9 / 10
पूर्व आफ्रिकेतील मलावी. या देशाची ओळख म्हणजे त्याचे वन्यजीव, वन, प्राणी आणि किनारपट्टी. ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि मलावी तलाव येथे फार प्रसिद्ध आहे. या देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची एकाही घटना आढळली नाही.
10 / 10
दक्षिण आफ्रिकेतील देश बुरुंडी देखील कोरोना विषाणूच्या संसर्गापासून लांब आहे. हा देश वन्यजीव, जंगल आणि हिरवेगार पणासाठी प्रसिध्द आहे. या देशात कोरोना विषाणूची एकही घटना समोर आलेली नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके