अरे देवा! चीनच्या अभिनेत्रीला नाकाची प्लास्टीक सर्जरी पडली महागात, याचा तिने कधी विचारही केला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 10:00 IST
1 / 10चीनमधील लोकप्रिय अभिनेत्री गाओ लियुने नुकतीच तिच्यासोबत घडलेली एक घटना फॅन्ससोबत शेअर केली आहे. २४ वर्षीय लियुने काही दिवसांपूर्वी आपल्या नाकाची सर्जरी केली होती. 2 / 10पण ही सर्जरी करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. लियु ने चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाईबोवर आपले फोटो शेअर केले आहेत. या प्लॅटफॉर्मवर अभिनेत्रीचे ५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.3 / 10डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, चीनमधील अनेक सिनेमात आणि मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले होते की, तिने चीनमधील एक शहर Guangzhou शहरातील एका क्लीनिकमधून नाकाची सर्जरी केली होती. 4 / 10तिच्या एका मैत्रिणीने तिला क्लीनिकमधील प्लास्टिक सर्जनसोबत भेट करून दिली होती. हे प्लास्टीक सर्जरी ऑपरेशन चार तास चाललं. पण तिला अजिबात अंदाज नव्हता की, चार तासांनंतर ती आणखी मोठ्या अडचणीचा सामना करणार आहे.5 / 10नाकाची प्लास्टिक सर्जरी केल्यावर तिचा लुक आणखी चांगला होईल असं तिला वाटलं होतं. तसेच असं करून तिला कामेही अधिक मिळतील असं तिला वाटलं होतं. नाकावर छोटीशी सर्जरी तिने केली. पण नाकात इन्फेक्शन झालं.6 / 10त्यामुळे तिला फॉलोअप सर्जरी करावी लागली. त्यामुळे नाकात नेक्रोसिसची समस्या झाली आहे आणि तिच्या नाकाचा शेंडा आता फार वाईट झाला आहे.7 / 10या अभिनेत्रीला नंतर समजलं की, प्लास्टिक सर्जरीचं हे हॉस्पिटल नाकाच्या सर्जरीसाठी सर्टिफाइड नव्हतं. याच कारणामुळे तिला दोन महिने हॉस्पिटलमध्ये भरती रहावं लागलं. यासाठी तिला ४५ हजार पाउंडचं नुकसान सहन करावं लागलं. 8 / 10अनेक कॉन्ट्रॅक्ट तोडण्यासाठी तिला २ लाख पाउंडचं नुकसान झालं. सध्या ही अभिनेत्री हॉस्पिटलकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.9 / 10चीनची मार्केट रिसर्च फर्म आयआयमीडियानुसार, प्लास्टिक सर्जरीचं मार्केट सध्या चीनमध्ये बूमवर आहे आणि गेल्यावर्षी या देशात साधारण दीड कोटी लोकांनी प्लास्टिक सर्जरी केल्या. 10 / 10प्लास्टिक सर्जरीची वाढती डिमांड पाहता अनेक ठिकाणी सर्टिफाइड नसलेले हॉस्पिटलही सुरू झालेत. हे लोक चुकीच्या सर्जरी करून लोकांना नुकसान पोहोचवत आहेत.