काय सांगता? टेलिफोनच्या व्हायरला मिळतेय सोन्याच्या हारापेक्षा जास्त किंमत; आकडा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:08 IST
1 / 5इतालवी लक्जरी फॅशन हाऊस बोटेगा वेनेटाचा हे फोटो सध्या एका विचित्र प्रकारच्या हारामुळे चर्चेत आहेत. एक प्रसिद्ध ब्रँण्ड हा हार विकत आहे. हा एखाद्या टेलिफोन कॉर्डप्रमाणे दिसतो. पण तुम्ही घरी वापरता तशी ही टेलिफोन कॉर्ड मुळीच नाही. 2 / 5एका क्लासिकलस लँडलाईन टेलिफोनप्रमाणे ही कॉर्ड दिसते. पण तुम्ही याची किंमत वाचून अवाक् व्हाल. २०० अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ४५ हजार रूपयांची हा हार विकला जातोय.3 / 5डायट प्राडानं २००० डॉलरच्या एका हाराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे तसंच यातील फरक लोकांना दाखवण्यासाठी टेलिफोन कॉर्डचाही फोटो शेअर केला आहे. 4 / 5हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून ६५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. 5 / 5 सोशल मीडियावर या लक्जरीस ब्रँण्डला खूप ट्रोल केलं जातंय.