शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

या गावात आवडती मुलगी शोधल्यावर तिला पळवून नेतो, कुटुंबियांचीही नसते काही हरकत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:35 IST

1 / 7
Madhya Pradesh’s Bhagoria Festival: भारतातल्या अनेक भागांमध्ये अशा अशा परंपरा आहेत ज्याबाबत वाचल्यावर कुणीही हैराण होतं. मध्य प्रदेशातील एका जमातीमध्येही काही अजब परंपरा आहे. ज्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या लोकांमध्ये साजरा केला जाणारा भगोरिया फेस्टिव्हलबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 7
इथे तरूण पुढे आपल्या आवडत्या तरूणीवर रंग टाकतो. त्यानंतर तरूणीही तरूणाच्या चेहऱ्यावर गुलाल लावते किंवा त्याच्याकडून पान घेते. हा तिचा एकप्रकारे लग्नासाठी होकार असतो. जर दोघेही एकमेकांना आवडले असतील तर ते पळून जातात. कधी तरूणी मुलाच्या घरी जाते किंवा नातेवाईकांच्या किंवा एखाद्या मित्राच्या घरी जातात. त्यानंतर आपल्या परिवाराच्या सहमतीने होळीच्या आसपास लग्न करतात.
3 / 7
मध्य प्रदेशातील तीन आदिवासी जिल्हे अलीराजपुर, झाबुआ आणि शहडोलमध्ये होणाऱ्या भगोरिया हाट किंवा भगोरिया फेस्टिव्हलचं हे चित्र आहे. होळीच्या सात दिवसआधी साजरा केला जाणारा हा भगोरिया हाट भील जमातीचा उत्सव आहे.
4 / 7
मध्य प्रदेशातील तीन आदिवासी जिल्हे अलीराजपुर, झाबुआ आणि शहडोलमध्ये होणाऱ्या भगोरिया हाट किंवा भगोरिया फेस्टिव्हलचं हे चित्र आहे. होळीच्या सात दिवसआधी साजरा केला जाणारा हा भगोरिया हाट भील जमातीचा उत्सव आहे.
5 / 7
भगोरिया नावाचा जन्मच 'पळून जाणे' यातून झाला आहे. नावातच याचं स्पष्टीकरण आहे. या उत्सवात भाग घेणाऱ्या पहिल्या तरूणाचं नाव भाव आणि तरूणीचं नाव गौरी होतं. ते दुसरे कुणी नसून भगवान शिव आणि पार्वती आहे. त्यामुळे याचं नाव भगोरिया पडलं.
6 / 7
स्थानिक लोक सांगतात की, राजा भगोरेने या भागावर विजय मिळवला आणि त्यांनी आपल्या सेनेला आपल्या पसंतीच्या तरूणीसोबत हाटमध्ये पळून जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या रूपात या परंपरेचं पालन केलं जातं.
7 / 7
कारण कोणतंही असो देशात तरूणांना आपला जोडीदार निवडण्याची स्वातंत्र्य मिळत आहे. भगोरिया उत्सवात असा रिवाज आहे की, जर तरूणीला तरूण पसंत नसेल तर ती रंग-रगडून पुढे निघून जाते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेश