By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:03 IST
1 / 6डायनोसॉर यांच्या युगापासून मगर असल्याचा दावा अनेक पुरातत्व अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे डायनोसॉरच्या अंतानंतर पृथ्वीतलावर जीवंत असलेला सर्वात जुना प्राणी म्हणून मगरीचा उल्लेख केला, तर तो चुकीचा ठरणार नाही. 2 / 6अमेरिकेतील एका शिकाऱ्यानं १३ फुट लांब मगरीची शिकार केली आणि जेव्हा त्यानं या मगरीचं पोट फाडलं तेव्हा शिकारीच सून्न झाला. 3 / 6जॉन हॅमिल्टन नावाचा हा शिकारी त्या मगरीला कापण्यासाठी अमेरिकेतील शिकारी शेन स्मिथ याच्याकडे घेऊन गेला. जेव्हा या दोघांनी मगरीचं पोट फाडलं तेव्हा त्यांना तिच्या पोटात प्राचीन बाणाचं टोक आणि Plummet ( यंत्र) सापडलं. 4 / 6ALच्या वृत्तानुसार Mississippi राज्यच्या भूविज्ञानी यांच्या माहितीनुसार तो बाण ५ ते ६ हजार वर्षांपूर्वीचा आहे. शेननं त्याच्या फेसबूकवर लिहिलं की, जॉन हॅमिल्टन हा आज १३ फूटांची मगर घेऊन आमच्याकडे आला. तिच्या पोटात सापडलेलं बाणाचं टोक व प्लमेट पुरातन काळातील आहेत. ज्याचा उपयोग मुळ अमेरिकन मासे पकडण्यासाठी करायचे. या मगरीच्या पोटात माशांची हाडंही सापडली.'5 / 6''मी याबाबत फेसबूक पोस्ट करू की नको, असा विचार मी करत होतो. कारण लोकांना यावर विश्वास बसणार नाही. पण, मी माझा विचार बदलला आणि ही माहिती शेअर केली. 6 / 6''मी याबाबत फेसबूक पोस्ट करू की नको, असा विचार मी करत होतो. कारण लोकांना यावर विश्वास बसणार नाही. पण, मी माझा विचार बदलला आणि ही माहिती शेअर केली.