म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'हा' आहे स्वर्गात जाण्याचा रस्ता, एका देशातून जातो मार्ग; पण होतोय बंद....कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 15:06 IST
1 / 10अमेरिकेतील होनोलूलूमधलं‘स्वर्गाची शिडी’ (Stairway to Heaven) नावाचं लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आता बंद होणार आहे. तेथील नगर परिषदेनं हे ठिकाण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच बहुमतानं हा प्रस्ताव पारित झाला.2 / 10अमेरिकेतील होनोलूलमध्ये एक 3922 पायऱ्यांचा जिना आहे, जो तिथं येणाऱ्या पर्यटकांना तब्बल 2400 फूटांवर घेऊन जातो. हे ठिकाण ‘स्वर्गाची शिडी’ या नावानं ओळखलं जातं. दरवर्षी शेकडो लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.3 / 10हे ठिकाण अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.4 / 10हे ठिकाण अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.5 / 10१९४२ साली अमेरिकेच्या सैन्यानं अँटिना लावण्यासाठी हा मार्ग बनवला होता. शहराच्या एका भागाचा दुसऱ्या भागाशी संपर्क व्हावा, यासाठी हा अँटीना उभारण्यात आला होता.6 / 10इथे चढणं अत्यंत धोकादायक असल्याने येथे येण्यास बंदी आबे. तसेच या पायऱ्या चढणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. मात्र तरीही हजारो लोक या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवण्यासाठी ते येण्यापूर्वीच अनेक नागरिक या ठिकाणी दाखल होतात.7 / 10पूर्वी या पायऱ्या लाकडी होत्या. त्यानंतर त्या काँक्रिटच्या करण्यात आल्या. नागरिक या ठिकाणी प्रवेश कऱणं कायदेशीर करावं, अशी मागणी करत आहेत.8 / 10असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च ते २३ मार्च या कालावधीत इथं या पायऱ्या चढणाऱ्या ६ पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे.9 / 10वास्तविक, हे ठिकाण धोकादायक असलं तरी आतापर्यंत या ठिकाणी एकाच नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गायक आणि हास्य कलाकार फ्रिट्झ हसनपुश यांना या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला होता.10 / 10येथे नियमांच उल्लंघन झाल्यावर १ हजार डॉलर इतका दंज आकारण्यात येतो.