'ही' आहे 2024 मधील जगातील सगळ्यात सुंदर महिला, वाचा तिच्यात असं काय की ठरली अव्वल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:10 IST
1 / 6Most Beautiful Woman in the World : जगातील जास्तीत जास्त लोक सुंदरतेच्या मागे लागलेले असतात. कुणाला सुंदर दिसायचं असतं तर कुणी सुंदर व्यक्तींच्या मागे लागतात. अनेकदा जगातील सगळ्यात सुंदर महिलेचीही चर्चा होत असते. जगातील सगळ्यात सुंदर महिला कोण? असं लोकांना विचारलं गेलं तर लोक वेगवेगळी उत्तर देऊ शकतात. मात्र, सायन्स याबाबत बरोबर उत्तर देतं.2 / 6वेगवेगळ्या गोष्टींसोबत सायन्सने सुंदरताही शोधली आहे आणि सुंदरतेचे मापदंड ठरवून सांगितलं की, जगातील सगळ्यात सुंदर महिला कोण आहे. यानुसार वर्ष २०२४ मधील जगातील सगळ्यात सुंदर महिला ब्रिटीश अभिनेत्री जॉडी कोमर ही आहे. 3 / 6जगातील सगळ्यात सुंदर महिला शोधण्यासाठी सायन्सने 'गोल्डन रेशिओ'चा वापर केला. यासाठी जुन्या गणितज्ञांद्वारे तयार करण्यात आलेल्या सौंदर्याचा मापदंडाचा वापर करण्यात आला. 4 / 6गोल्डन रेशिओचा वापर चेहऱ्याचे वेगवेगळे भाग, जसे की, डोळे, नाक, ओठ आणि चेहऱ्याची समरूपता मोजण्यासाठी केला जातो. यानुसार, चेहऱ्याची संरचना जेवढी जास्त या मापदंडाच्या जवळ जाते, त्याला तेवढंच जास्त सुंदर मानलं जातं. 5 / 6जेव्हा गोल्डन रेशिओच्या मदतीने जगातील सगळ्यात सुंदर महिला शोधण्यात आली तेव्हा या यादीत सगळ्यात वर ब्रिटीश अभिनेत्री जॉडी कोमरचं नाव होतं. तिच्या चेहऱ्या गोल्डन रेशिओ स्कोर 94.52 टक्के इतका आहे. म्हणजे गोल्डन रेशिओनुसार तिचा चेहरा आदर्श आहे.6 / 6सायन्सने गोल्डन रेशिओच्या माध्यमातून जगातील सगळ्यात सुंदर महिलेंच्या यादीत १० महिलांची निवड केली. यात भारतातील एकच नाव आहे. ते नाव म्हणजे दीपिका पादुकोन.