शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ लाख खर्च करून बनला होता 'कुत्रा'; आता त्यातूनच उभारला बिझनेस, ३ तासांची कमाई पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:55 IST

1 / 10
जपानमध्ये राहणाऱ्या टोकोनं त्याच्या अनोख्या छंदाला पूर्ण करण्यासाठी जे केले त्यामुळे तो जगात व्हायरल झाला. काही वर्षापूर्वी टोकोने कुत्र्‍यासारखे दिसण्यासाठी लाखो रूपये खर्च करून एक ड्रेस बनवून घेतला होता. हा ड्रेस घातल्यानंतर तो एका सामान्य कुत्र्‍यासारखा हुबेहुब दिसायला लागला.
2 / 10
टोकोचा हा अजब अवतार सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनला होता. जपानमधील टोको हा त्याच्या नव्या लूकमुळे जगात प्रसिद्ध झाला. टोकोचा लूक चांगलाच व्हायरल झाला त्यातूनच टोकोला नव्या बिझनेस आयडियाची कल्पना सुचली आणि त्याने या बिझनेससाठी प्लॅनिंग करण्याचं काम सुरू केले.
3 / 10
टोको हा त्याचा डॉग कॉस्ट्यूम भाड्याने देऊ लागला. ज्यामुळे त्याला तासाला २० हजार ते २६ हजार रुपये भाडे मिळू लागले. जेव्हा टोकोची पोस्ट इंटरनेटवर व्हायरल झाली तेव्हा लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. टोकोच्या या लूकवर अनेकांनी आपल्या कमेंट्स नोंदवल्या होत्या.
4 / 10
टोकोला आतापर्यंत अल्ट्रा रियलिस्टिक डॉग ड्रेस भाड्याने द्यावा यासाठी अनेकांनी मागणी केली. २६ जानेवारीपासून टोकोनेही लोकांच्या मागणीचा विचार करून कॉस्ट्यूम रेंटल सेवा सुरू केली. डॉग कॉस्ट्यूम रेंटवर देण्यासाठी टोकोने अधिकृतपणे त्याची वेबसाईटही तयार केली
5 / 10
या वेबसाईटवरून ज्याला कुणाला हा ड्रेस भाड्याने घ्यायचा असेल त्यांना बुकींग करण्याची सेवा उपलब्ध केली. ही सेवा फक्त अशाच लोकांसाठी आहे ज्यांना स्वत:ला डॉग बनण्याची इच्छा आहे. परंतु ही सेवा मोफत नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीला मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे.
6 / 10
डॉग ड्रेस भाड्याने घेणाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जसं की तुम्हाला प्राणी का व्हायचं आहे, रिपोर्टनुसार, जर कुणाला कुत्रा बनायचं असेल तर त्याला कमीत कमी ३० दिवस आधी बुकींग करावी लागणार आहे. त्यानंतर ३ तासांसाठी ४९ हजार येन(जवळपास २६,५०० रुपये) भाडे लागेल.
7 / 10
जर कुणाला ३ तासांपेक्षा कमी म्हणजेच २ तासासाठी हा डॉग ड्रेस भाड्याने हवा असल्यास त्याला ३६ हजार येन(१९,५०० रुपये) दर आकारले जातील. विशेष म्हणजे, जेव्हा टोकोने ही सर्व्हिस सुरू केली, त्यानंतर काही तासांतच याचे बुकींग आऊट ऑफ स्टॉक झाले होते.
8 / 10
लहानपणापासूनच मला कुत्र्यासारखा दिसणारा ड्रेस घालून प्राणी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचे होतं. मी लहानपणी असं विचार करायचो, 'काश!' जर अशी काही सर्व्हिस असती तर...ते मला प्राणी बनवतील. माझ्यासारख्या माणसासाठी मी आता काही करू शकत नाही का? असं टोकोने म्हटलं होते.
9 / 10
म्हणून मी आता 'टोकोटोको प्राणीसंग्रहालय' उघडण्याची योजना आखली आहे. मी अशा वस्तू भाड्याने देण्याची आणि अशा सेवा देण्याची योजना आखत आहे ज्यात माणसांना प्राण्यासारखं बनवतील. हा ड्रेस घालू इच्छिणाऱ्या लोकांना काही नियमांचे पालन करावे लागेल. ते परिधान करणारी व्यक्ती किमान ४ फूट ११ इंच उंच असावी असं टोकोने त्याच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओत म्हटलं.
10 / 10
टोकोने ही सेवा ५ फूटाहून अधिक व्यक्तींसाठी ठेवली नाही. कारण हा ड्रेस त्यांना येणार नाही. टोकोने बनवलेल्या वेबसाईटनुसार, श्वान पाळणारे लोक ग्रुपमध्येही त्यांचा अनुभव घेऊ शकतात कारण एका बुकींगमध्ये जास्तीत जास्त ३ लोकांना ड्रेस मिळू शकतो.
टॅग्स :dogकुत्राbusinessव्यवसाय