1 / 5अॅम्ब्रिया, इटली: या भागातील इमारती, बाल्कनी, खिडक्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या आहेत. या फुलांचा सुगंध संपूर्ण रस्त्यात पसरलेला असतो. हाच दरवळणारा सुगंध आता या रस्त्याची ओळख बनला आहे. 2 / 5सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफॉर्निया: या भागातील व्हिक्टोरियन स्थापत्यशास्त्रानुसार उभारण्यात आलेली आहेत. वसंत महिन्यात या भागातील दृश्य अतिशय विलोभनयीय असतं.3 / 5पोर्टो एलेग्रे, ब्राझील: या शहराचं त्रिभाजन करण्यात आलं असून तिथे अनेक सुंदर झाडं लावण्यात आली आहेत. या भागातील रूआ गोंजकले दे कार्वाल्हो हा 500 मीटर लांबीचा रस्ता नितांत सुंदर आहे. या रस्त्याच्या दुर्तफा 100 हून अधिक टिपुआनाची झाडं पाहायला मिळतात. 4 / 5ग्राफ्टन, ऑस्ट्रेलिया; पाऊंट स्ट्रिटला ऑस्ट्रेलियात जॅकरांडा ऍव्हेन्यु नावानं ओळखलं जातं. या रस्त्याजवळ मोठ्या प्रमाणात लाइलेक फुलं पाहायला मिळतात. या फुलांमुळे रस्त्याच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. 5 / 5बॅलीमनी, पूर्व आयर्लंड: जर तुम्हाला गूढ आणि भीतीदायक जागा आवडत असतील, तर ब्रेगाघ रस्त्याजवळ तुम्हाला अशी जागा मिळेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी झाडांमुळे हा रस्ता अतिशय रहस्यमयी दिसतो.