व्हिसा शिवायही या ५ सुंदर देशांमध्ये फिरण्याचा घेऊ शकता आनंद, स्वस्तात मस्त परदेशवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:43 IST
1 / 7Visa Free Countries To Travel: सोयीस्कर झालेल्या विमान सेवा आणि लोकांकडे आलेल्या अधिकच्या पैशांमुळे आजकाल भरपूर लोक परदेशात फिरायला जातात. परदेशात फिरायला जाणं आता फारच सोपं आणि फॅशन स्टेटस झालं आहे. पण यात एक महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे व्हिसा. जगात असेही काही देश आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय सुद्धा फिरायला जाऊ शकता. अशाच काही देशांची नावं जाणून घेऊ.2 / 7हिंद महासागराच्या तटावर वसलेला मॉरीशस देश खूपच सुंदर आहे. स्वच्छ पाणी, सुंदर बीच, अॅडव्हेंचरसाठी आणि हनीमून डेस्टिनेशन म्हणून हा देश चांगलाच प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही व्हिसाशिवाय ९० दिवस राहू शकता.3 / 7मलेशियामध्ये भारतीयांसाठी ३० दिवसांची व्हिसा फ्रि एन्ट्री आहे. हा देश आपली नाइट लाइफ, नैसर्गिक सौंदर्य, सुंदर समुद्र किनारे आणि नॅशनल पार्कसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. 4 / 7आता केवळ नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठीच नाही तर सगळ्याच पर्यटकांसाठी मालदीव एक फेमस डेस्टिनेशन झालं आहे. येथील सुंदर बेटं, समुद्रातील स्वच्छ निळशार पाणी लोकांना आकर्षित करतं. इथे तुम्ही ३० दिवस व्हिसाशिवाय राहू शकता.5 / 7जगभरातील लाखो पर्यटक थायलॅंडमधील नाइट लाइफ, येथील सुंदर मंदिरे, नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी जात असतात. भारतीय लोक या देशात ३० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहू शकतात आणि येतील जीवनाचा आनंद घेऊ शकतात.6 / 7भारताचा शेजारी देश भूतान सुद्धा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि संस्कृतीसाठी जगात फेमस आहे. येथील जगलं आणि डोंगर एक वेगळाच आनंद देतात. या देशात भारतीय लोक व्हिसाशिवाय जाऊ शकतात.7 / 7हिमालयाच्या कुशीत वसलेला आणि जंगल व सुंदर डोंगरांनी वेढलेला देश म्हणजे नेपाळ. लाखो पर्यटक इथे जगभरातून येतात. येथील पशुपतिनाथ मंदिर खूप प्रसिद्ध आहे. भारतीयांना इथे व्हिसाशिवाय जाता येतं.