शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'या' परिवाराने तब्बल १४२ वर्षांपासून आजही सांभाळून ठेवलाय 'हा' केक, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:29 IST

1 / 10
घरांमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आणि संस्कृती सांभाळून ठेवणं ही एक सामान्य बाब आहे. काही लोक आपले खानदानी दागिने सांभाळून ठेवतात तर काही लोक कपडे आणि भांडी. मात्र, एका परिवाराने कौटुंबिक वारसा म्हणून अशी वस्तू सांभाळून ठेवली आहे की, वाचून थक्क व्हाल.
2 / 10
या फ्रूट केकचा इतिहासही फारच आश्चर्यकारक आहे. कारण हा केक १८७८ मध्ये फिडेलिया फोर्ड नावाच्या महिलेने तयार केला होता.
3 / 10
फिडेलिया फोर्ड या स्वत: आपल्या हाताने केक तयार करत होत्या आणि वर्षभर सांभाळून ठेवत होत्या. सुट्ट्यांमध्ये संपूर्ण परिवार एकत्र येत होता. तेव्हा सगळे एकत्र बसून हा केक खात होते.
4 / 10
९३ वर्षांपर्यंत मॉर्गन फोर्ड आपल्या परिवाराला एकत्र जमवून फिडेलिया फोर्डची कहाणी ऐकवत होते आणि ही परंपरा पुढे नेण्यास सांगत होते. तेव्हापासून या परिवारातील पुढील पिढ्यांनी हा फ्रूटकेक चांगल्याप्रकारे सांभाळून ठेवलाय
5 / 10
१८७८ मध्ये ६५ व्या वयात फिडेलिया फोर्ड यांचं निधन झालं होतं. यावर्षीही त्यांनी परिवारासाठी आपल्या हाताने केक तयार केला होता.
6 / 10
अमेरिकेतील मिशिगन राज्यातील एका परिवाराने हा केक आपली कौटुंबिक वारसा म्हणून सांभाळून ठेवला आहे आणि पुढेही ठेवणार आहेत.
7 / 10
फिडेलिया यांची नातीची पणती ज्यूली रूटिंगर सांगतात की, 'ही विरासत सांभाळून ठेवणं ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. ही आमच्या घरात चालत आलेली परंपरा आहे'.
8 / 10
ज्यूली रुटिंगरचे वडील मॉर्गन फोर्ड जे फिडेलिया फोर्डचे पणतू होते. त्यांनी चीनहून मागवलेल्या एका बॉक्समध्ये काचेच्या भांड्यात हा केक सजवून ठेवला होता.
9 / 10
सुट्टींची दिवस आले आणि सर्व परिवार एकत्र आला. पण त्यांनी निर्णय घेतला की, हा केक आता कधीच खायचा नाही तर वारसा म्हणून सांभाळून ठेवू.
10 / 10
हा फ्रूट केक फिडेलिया फोर्ड यांना सन्मान देण्यासाठी तेव्हापासून तसाच ठेवला आहे. मॉर्गन फोर्ड यांनी निधनाआधी या केकची काळजी घेतली होती. कारण त्यांच्यासाठी हा केक फार महत्वाचा होता.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स