ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांची मांदियाळी, ग्रंथ दिंडीस सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:22 IST
1 / 6जळगाव : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आजपासून होत आहे.2 / 6त्यानिमित्त ग्रंथ दिंडीस सुरुवात झाली असून साहित्यिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 3 / 6या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. 4 / 6तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या साहित्य संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या साहित्य संमेलनकडे लागले आहे. 5 / 6सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अविस्मरणीय ठरावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.6 / 6आज सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.