जगातली ही आहेत 7 विषारी झाडं, जिवाला ठरू शकतात घातक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 23:04 IST
1 / 7अनेक वनस्पती या विषारीही असतात. पण तो विषारीपणा हा त्यांच्या स्व-संरक्षणाचा भाग असतो. विशेष म्हणजे अशा झाडाची चव चाखल्यावर तुमच्यावर मृत्यू ओढावू शकतो. केरळ आणि आजूबाजूच्या किनारी भागात कॅरबेरा ओडोलम हे झाड (Cerbera odollam) आढळते. या झाडांच्या फळाच्या आतील भागात एल्कालॉइड असते. या झाडांची फळं सेवन केल्यास हृदय आणि श्वसननलिका बंद पडते. 2 / 7कनेराचा सर्व भाग घातक असतो. याच्या सेवनानं उल्टी, चक्कर येणे, लूज मोशनसारख्या घटना घडतात. कधी कधी व्यक्ती कोमातही जातो. या झाडांच्या पानांचा स्पर्श शरीराला झाल्यास खास सुटते. 3 / 7रोजरी पीच्या बियांचा वापर ज्वेलरी आणि प्रार्थनेसाठी वापरण्यात येणाऱ्या माळेत केला जातो. या झाडाच्या बिया विषारी असतात. या बिया खाल्ल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. 4 / 7एरंडाच्या बियांपासून कॅस्टर ऑइल काढलं जातं. याच्या बिया सेवन केल्यास मृत्यूही ओढावू शकतो. 5 / 7वाइट स्नेकरूट या झाडाच्या फुलांमुळेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंक यांची आई हँक्सचा मृत्यू झाला. हे झाडं उत्तर अमेरिकेत आढळतं. एका गायीनं या झाडाचं फूल खाल्लं होतं. त्या गाईचं दूध प्यायल्यानेच अब्राहम लिंकनं यांच्या आईचा मृत्यू झाला होता. 6 / 7घातक नाइटशेड या झाडाला बेलाडोनाही संबोधलं जातं. मध्य आणि दक्षिण आशियात हे झाड आढळतं. या झाड्यांच्या पानांचा रंग हिरवा असतो. तर या झाडाची फळं काळ्या रंगाची असतात. 7 / 7वॉटर हेमलॉकही उत्तर अमेरिकेत आढळणारं सर्वात विषारी झाड आहे. या झाडाच्या फुलांच्या रंगानं बऱ्याचदा मनुष्य धोका खातो. या झाडाच्या फुलांमुळे चक्कर, पोटात दुखणं सारख्या व्याधी जडतात.