शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:13 IST

1 / 7
रिपब्लिकन खासदार बडी कार्टर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. विविध वादग्रस्त निर्णयांनी घेरलेल्या ट्रम्प यांच्या नामांकनामागे कोणकोणती गणिते आहेत...
2 / 7
नोबेलसाठी कशी होते निवड? : दरवर्षी जगातील शांतता संघटना, प्रोफेसर्स व खासदार या पुरस्कारांसाठी शेकडो नावांची शिफारस करीत असतात.
3 / 7
नामांकन झाले म्हणजे पुरस्कार मिळतोच किंवा इतरांचे समर्थन प्राप्त होतेच असे नाही. ठोस योगदानाच्या आधारावरच पुरस्कारासाठी निवड होत असते. नॉर्वेतील समिती ऑक्टोबर महिन्यात निवड करेल.
4 / 7
याआधीही झाले का ट्रम्प यांचे नामांकन? : २०१८, २०२० आणि २०२१ मध्येही ट्रम्प यांचे नामांकन झाले होते. उत्तर-दक्षिण कोरिया चर्चा, सर्बिया-कोसोवो समझोता आणि अब्राहम अकॉर्डससाठी ही नामांकने झाली. खुद्द ट्रम्प म्हणाले होते की, मला आतापर्यंत पाच-सहा वेळा नोबेल मिळायला हवे होते. पण, ते नेहमीच डाव्या विचारसरणीला दिले जाते.
5 / 7
का मागे फिरले पाकिस्तान व युक्रेन? :युक्रेनचे खासदार मेरेझ्को यांनी २०२४ मध्ये ट्रम्प यांचे नामांकन केले होते. पण नंतर, ‘ट्रम्प यांनी फक्त युद्ध थांबवण्याच्या नुसत्याच बाता केल्या. प्रत्यक्षात युद्ध थांबवण्यासाठी काहीही केले नाही’ असे सांगत घुमजाव केले. पाकिस्तानने अलीकडेच त्यांचे नामांकन केले मात्र, इराणवरील हल्ल्यानंतर लगेच ते मागेही घेतले.
6 / 7
यंदा नोबेल समितीकडे ३३८ मानांकने : २०२६ साठी आतापर्यंत नोबेल समितीकडे ३३८ मानांकने आली आहेत. त्यात २४४ व्यक्ती, ९४ संघटना आहेत. ट्रम्प यांचे नाव त्यात आहे की नाही, हे कळण्यास मार्ग नाही, कारण समिती याबाबत अधिकृतरीत्या काहीही माहिती देत नाही.
7 / 7
कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल? : यात पहिले आहेत थिओडोर रुझवेल्ट (१९०६, रशिया-जपान युद्धात मध्यस्थी), दुसरे वुड्रो विल्सन (१९१९, लीग ऑफ नेशन्सची स्थापना), तिसरे जिमी कार्टर (२००२, मानवाधिकारांसाठी कार्य), आणि चौथे बराक ओबामा (२००९, आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना).
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNobel Prizeनोबेल पुरस्कारAmericaअमेरिका