शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? वाचा पहिल्या मेसेजची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:02 IST

1 / 7
३ डिसेंबर १९९२ रोजी जगातील पहिला एसएमएस (शॉर्ट मेसेज सर्व्हिस) पाठवला गेला होता. एका २२ वर्षीय इंजिनिअरने त्यांच्या सहकाऱ्याला मेसेज पाठवला होता. हा मेसेज पाठवण्यासाठी एका पर्सनल कम्प्युटरचा वापर केला गेला होता.
2 / 7
त्यावेळी २२ वर्षांचे इंजिनिअर असलेल्या नील पापवर्थ यांनी त्याचा सहकारी रिचर्ड जार्विसच्या मोबाईलवर व्होडाफोन नेटवर्कच्या साहाय्याने हा मेसेज केला होता.
3 / 7
नील पापवर्थ त्यावेळी अँग्लो-फ्रेंच आयटी सेवा कंपनी सेमा ग्रुप टेलिकॉम कंपनीत काम करत होते. व्होडाफोन ब्रिटनसाठी शॉर्ट मेसेज सर्व्हिस सेंटर विकसित करणाऱ्या टीमचा ते एक सदस्य होते.
4 / 7
लंडनच्या पश्चिम दिशेला असलेल्या एका जागेवर सिस्टिम विकसित केल्यावर पापवर्थ यांनी कम्प्युटर टर्मिनलवर बसून व्होडाफोन केल संचालक रिचर्ड जार्विस यांना मोबाईलवरून एसएमएस पाठवला होता, त्यावेळी जार्विस सुट्टीवर होते आणि पार्टीत होते.
5 / 7
नील पापवर्थ यांनी रिचर्ड यांना जो पहिला एसएमएस पाठवला होता, त्यात लिहिले होते 'मेरी ख्रिसमस'. याबद्दल नील पापवर्थ यांनी त्यांचा अनुभवही नंतर सांगितला होता.
6 / 7
'माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट नाहीये. मी माझं काम करत होतो आणि खात्री करत होतो की, आमचे सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत आहे की नाही. कारण दीर्घकाळापासून आम्ही त्याच्यावर काम करत होतो', असे पापवर्थ यांनी नंतर सांगितले होते.
7 / 7
त्यावेळी मोबाईलवर मेसेजला उत्तर दिले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे रिचर्ड यांना मेसेज मिळाला की नाही, हे कॉलवरून समजले. कारण पापवर्थ यांना ख्रिसमस पार्टीतून एक कॉल आला आणि त्यांनी सांगितले की, पाठवलेला मेसेज व्यवस्थित आला आहे. इथूनच मेसेजिंग विकसित होण्यास सुरूवात झाली.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलVodafoneव्होडाफोन