शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा? दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:50 IST

1 / 7
तुम्ही किती देशांत विना व्हिसा किंवा 'व्हिसा ऑन अराइव्हल'वर प्रवास करू शकता, यावरून तुमच्या देशाच्या पासपोर्टची ताकद ठरते. २०२६ च्या ताज्या 'हेनली पासपोर्ट इंडेक्स'नुसार, सिंगापूरने सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टचा मान पटकावला आहे. सिंगापूरचे नागरिक आता जगातील १९२ देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतात.
2 / 7
जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर प्रामुख्याने आशियाई आणि युरोपीय देशांनी बाजी मारली आहे. यामध्ये पहिला क्रमांक अर्थात रँक १ ही सिंगापूरने पटकावली आहे. या देशाच्या पासपोर्टला १९२ देशांत विना व्हिसा प्रवेश आहे.
3 / 7
या यादीत दुसरा क्रमांक अर्थात रँक २, जपान आणि दक्षिण कोरियाची आहे. या दोन्ही देशांचे नागरिक १८८ देशांमध्ये सहजरित्या प्रवास करू शकतात. तर, तिसरा क्रमांक अर्थात रँक ३ ही डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांची आहे. या पाच युरोपीय देशांच्या पासपोर्टवर १८६ देशांमध्ये विना व्हिसा प्रवेश मिळतो.
4 / 7
भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे की, २०२६ च्या रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्टने ५ स्थानांची सुधारणा करत ८० वे स्थान गाठले आहे. २०२५ मध्ये भारत ८५ व्या स्थानावर होता. आता भारतीय नागरिक जगातील ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा व्हिसा-ऑन-अराइव्हल सुविधेचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशस आणि भूतान यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
5 / 7
एकेकाळी या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारा अमेरिका आता १० व्या स्थानावर घसरला आहे. अमेरिकन पासपोर्टवर १७९ देशांत विना व्हिसा जाता येते. तर युनायटेड किंगडम ७ व्या स्थानावर आहे.
6 / 7
या इंडेक्समध्ये अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात शेवटी अर्थात १०१ व्या क्रमांकावरआहे. या देशाच्या नागरिकांना केवळ २४ देशांतच विना व्हिसा प्रवेश मिळतो. सिरिया आणि इराक हे देशही या यादीत खालच्या क्रमांकावर आहेत.
7 / 7
कोणत्याही देशाचा पासपोर्ट शक्तिशाली होण्यामागे त्या देशाचे इतर देशांशी असलेले राजनैतिक संबंध, आर्थिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय करार कारणीभूत असतात.
टॅग्स :passportपासपोर्टInternationalआंतरराष्ट्रीय