इस्रायल वापरतो तो व्हाइट फॉस्फरस बॉम्ब आहे काय? एवढा खतरनाक की, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 07:54 IST
1 / 7इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यातच आता इस्रायलने पॅलेस्टाइनमध्ये लोकवस्ती असलेल्या भागात अत्यंत घातक असलेल्या व्हाइट फॉस्फरस बॉम्बचा मारा सुरू केला. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यास लगेच पेट घेणारा आणि पाण्यानेही न विझणाऱ्या या बॉम्बच्या वापरामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.2 / 7दुसरीकडे हमासला धडा शिकविण्यासाठी इस्रायलने केलेल्या नाकाबंदीमुळे गाझाला केला जाणारा अन्नधान्य, इंधन तसेच अन्नधान्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. 3 / 7किती धोकादायक? - फॉस्फरस आणि रबर एकत्रित करून व्हाइट फॉस्फरस बॉम्ब तयार केला जातो. त्याचा वापर केल्यानंतर तो लगेच पेट घेतो आणि परिसरातील ऑक्सिजन वेगाने शोषून घेतो.4 / 7त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो. पाण्याचा कितीही वापर केला, तरी फॉस्फरस संपेपर्यंत तो विझत नाही. 5 / 7१३०० अंश सेल्सिअस तापमान - व्हाइट फॉस्फरस बॉम्बने पेट घेतल्यास तो सुमारे १३०० अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता बाहेर टाकू शकतो. संपर्कात आल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा जळणे, विविध अवयव निकामी होतात. एवढेच नव्हे तर हाडेही वितळू शकतात. 6 / 7दुसऱ्या महायुद्धात झाला वापर - व्हाइट फॉस्फरस बॉम्बचा सर्वप्रथम वापर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर केला होता. त्यानंतर इराकनेही अमेरिकेवर त्याचा वापर केल्याचा आरोप केला होता.7 / 7११५ देशांनी घातली बंदी - १९८० च्या जिनिव्हा करारानुसार, व्हाइट फॉस्फरसचा वापर प्रतिबंधित केला आहे. ठोस कारण असल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. किमान वापर व्हावा, यासाठी करारावर ११५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.