युद्धादरम्यान बऱ्याच दिवसांनी दिसली व्लादिमीर पुतीन यांची ऑलिम्पियन गर्लफ्रेंड, बंकरमधून आली बाहेर, पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 21:41 IST
1 / 7युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची जुनी गर्लफ्रेंड सर्वांसमोर आली आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन अलिना कबाएवा हिला युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान बंकरमध्ये लपवण्यात आले होते. त्यामधून ती काही काळापूर्वीच बाहेर आली होती.2 / 7३९ वर्षांची अलिना बंकरमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा पब्लिकसमोर आली आहे. अलिनाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ती काळ्या समुद्राजवळ एका रिसॉर्टमध्ये दिसत आहे. ती एक जिम्नॅस्टिक ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी झाली होती. ज्यामध्ये सुमारे २८ मुलांनी सहभागी झाले होते. 3 / 7एप्रिल महिन्यामध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे. जेव्हा अलिना पब्लिकमध्ये दिसली आहे. हल्लीच एका चॅनलने अलिना हिचा उल्लेख लपलेली प्रिंसेस असा केला होता. त्यानंतर काही दिवसांनी अलिना सर्वांसमोर आली आहे. 4 / 7अलिनाने २८ जिम्नॅस्ट तरुणांना सांगितले की, माझी अपेक्षा आहे की, तुम्ही सर्व हार मानू नका. तु्म्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करा. लोकांना कधी दुखावू नका.5 / 7जिम्नॅस्ट अलिना हिने २००० च्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करताना २००४ मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर चार वर्षांनंतर २००८ मध्ये तिचं नाव व्लादिमीर पुतीन हिच्यासोबत जोडले गेले. 6 / 7दरम्यान, पुतीन यांनी याबाबत काही सांगितले नाही. मात्र २०१३ मध्ये त्यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर तीन वर्षांनी अलिना हिने एक अंगठी दाखवून खळबळ उडवली. २०१७ मध्ये अलिना हिला पुतीन यांच्यापासून जुळी मुले झाल्याची अफवा पसरली होती. 7 / 7रिपोर्ट्सनुसार पुतीन आणि अलिना यांना तीन मुलं आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाच्या लोकांना या नात्याबाबत सांगण्यात आलेले नाही. मात्र अलिनावर ब्रिटन, कॅनडा आणि युरोपियन युनियनने तिच्यावर बंदी घातली आहे.