Ukraine Russia War: युक्रेनला तो त्याग नडला! नाहीतर आज रशियाची हिम्मतही झाली नसती; लुळापांगळा बनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 20:07 IST
1 / 10रशियाने अखेर आज युक्रेनवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला केला. २००८ मध्ये जॉर्जिया, २०१४ मध्ये क्रिमिया आणि २०२२ मध्ये युक्रेन. रशियाने एकेक करून आपल्यापासून विभक्त झालेल्या देशांवर हल्ले चढविले. जॉर्जिया आणि युक्रेन एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग होते. 2 / 10बलाढ्य साम्राज्य होते. परंतू १९९१ मध्ये रशियाची शकले झाली आणि नवीन देश निर्माण झाले. तरी देखील रशियाला या देशांवर ताबा ठेवायचा होता. आज युक्रेन रशियाच्या तोडीस तोड असला असता, कदाचित जास्ती. परंतू १९९६ चा तो दिवस युक्रेनला कायमस्वरुपी लुळापांगळा बनवून गेला. 3 / 10आज रशिया केवळ १४ तासांत युक्रेनच्या राजधानीमध्ये घुसला. युक्रेनचे सैन्य रशियाच्या आक्रमक हल्ल्यांसमोर हतबल झाले. थोडाफार प्रतिकार केला, परंतू बहुतांश बटालियननी रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करली. अनेक चेकपोस्टवर तर रशियन सैन्याला हल्लाही करावा लागला नाही अशी अवस्था आज युक्रेनमध्ये दिसली. 4 / 10हतबल झालेला युक्रेन रशियाला तोडीस तोड उत्तर देऊ शकला असता. किंबहूना रशियावने युक्रेनवर हल्लाही केला नसता एवढी शक्ती युक्रेनकडे होती. रशियाकडे आज सहा हजार अण्वस्त्रे आहेत. एक वेळ अशी होती की युक्रेनकडेही मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे होती, एवढी की अमेरिका, रशियानंतर युक्रेनचाच नंबर लागत होता. विचार करा आज जर ती असती तर....रशियाचा हिंमत तरी झाली असती का?5 / 10 दुसरे महायुद्ध संपासंपायला अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हा रशियातच असल्याने युक्रेनमध्येही अणुबॉम्ब होते. तेव्हा दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रे बनविण्याची स्पर्धा रंगली होती. अमेरिका आणि सोव्हिएत संघामध्ये बिनसले तेव्हा नाटोमध्ये असलेल्या युरोपियन देशांवर वचक ठेवण्यासाठी रशियाने हजारो अणुबॉम्ब आणि अण्वस्त्रे युक्रेनमध्ये तैनात केली होती. 6 / 10१९९१ मध्ये सोव्हिएत संघ फुटला आणि तेव्हाच शीतयुद्ध संपल्याचे मानले गेले. युक्रेननेही रशियापासून विभक्त होण्याची घोषणा केली. मात्र ही हजारो अण्वस्त्रे युक्रेनमध्येच राहिली. रशिया आणि समर्थक देशांची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. यामुळे या देशांना पश्चिमी देशांशी चांगले संबंध आणि सहकार्याची गरज भासली. इथूनच युक्रेनच्या अण्वस्त्रांच्या त्यागाची स्टोरी लिहीली गेली. 7 / 10विविध तज्ज्ञ आणि मीडिया रिपोर्टनुसार हा दावा केला जातो. युक्रेनमध्ये तेव्हा १८०० ते २००० अण्वस्त्रे होती. ही संख्या अमेरिका आणि रशियानंतर सर्वात जास्त होती. सध्याच्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि रशियाकडेच अण्वस्त्रे आहेत. 8 / 10५ डिसेंबर १९९४ मध्ये हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये रशिया, युक्रेन, बेलारूस, कजाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत एका सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये युक्रेन, बेलारूस आणि कजाकिस्तानच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांचे हक्क अबाधित राखण्याचे आश्वासन दिले गेले. याला बुडापेस्ट मेमोरंडम ऑन सिक्योरिटी अश्योरेंस असे नाव दिले गेले. या बदल्यात या तीन देशांना त्यांच्याकडील अण्वस्त्रांचा त्याग करायचा होता. 9 / 10१९९६ मध्ये युक्रेनने त्यांच्याकडे असलेले सर्व अणुबॉम्ब रशियाकडे सुपूर्द केले. काही निष्क्रीय केले. अनेक तज्ज्ञांनी युक्रेनला तेव्हा घाईघाईत निर्णय न घेण्याचा सल्ला दिला होता. याच त्यागाचा आज युक्रेनला परिणाम भोगावा लागला आहे. युक्रेनला २०१४ मध्ये पहिला फटका बसला.10 / 10 रशियाने तेव्हा युक्रेनवर आक्रमण करून क्रिमिया क्षेत्राचा ताबा घेतला. सैन्य कारवाई करत युक्रेनचे दोन तुकडे केले. यानंतर रशियाने जनमत घेऊन क्रिमियाचे रशियात विलिनीकरण केले. तेव्हाही अमेरिकेने रशियावर प्रतिबंध लादले होते. परंतू त्याचा काहीच परिणाम झाला नाही.