शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:02 IST

1 / 7
गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे प्रतिस्पर्धी असलेले चीन आणि पाकिस्तान चांगलेच जवळ आले आहेत. त्यात भिकेकंगाल पाकिस्तानला चीन सर्वतोपरी मदत पुरवत असतो. दरम्यान, आता चीनने पाकिस्तानला ट्रॅकलेस मेट्रो सबवे ऑन व्हिल्स भेट दिली आहे. या मेट्रोची सेवा लाहोरमध्ये सुरू झाली आहे.
2 / 7
मरियम नवाज यांनी या मेट्रो सेवेचं उद्घाटन केलं आहे. या मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजे तिला धावण्यासाठी रुळांची आवश्यकता नाही. तर ही मेट्रो रस्त्यावरून धावते. तसेच ही मेट्रोसेवा पर्यावरणासाठी पूर्णपणे अनुकूल आहे.
3 / 7
ही मेट्रो चीनमध्ये तयार करण्यात आली असून, चीनने भेट दिलेली ही भेट पाकिस्तानसाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
4 / 7
सध्यातरी लाहोरमध्ये चालवण्यात येत असलेली ही मेट्रो सेवा ३० शहरांमध्ये सुरू करण्याचा विचार पाकिस्तानमधील पंजाब सरकार करत आहे. शहरी वाहतुकीला आधुनिक बनवणे आणि पर्यावरण सुधारणे हा ही सेवा सुरू करण्यामागचा हेतू आहे.
5 / 7
महागडे रूळ आणि उंच कॉरिडॉरची आवश्यकता नसल्याने ही मेट्रो सेवा खास अशी आहे. ही मेट्रो म्हणजे एक प्रकारची मल्टी कोच इलेक्ट्रिक बसच आहे. त्यामधूनन २५० ते ३०० प्रवासी आऱामात प्रवास करू शकतात. या बस ऑटोनॉमस रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टिमवर चालतात. ती सौर ऊर्जेवर चार्ज होते. सिस्टिम बऱ्यापैकी स्वस्त आहे.
6 / 7
या मेट्रोमुळे शहरातील वाहतुकीच्या समस्या कमी होतील आणि लोक आरामात प्रवास करू शकतील, असा दावा केला जात आहे. लाहोरमध्ये सुरू झालेल्या या मेट्रो सेवेला मेट्रो ऑन हिल्स म्हणूनही संबोधलं जात आहे.
7 / 7
ही मेट्रो रस्त्यांवरून धावत असली तरी ती वाहतूक कोंडीत अकडू नये म्हणून तिची डिझाइन आणि रस्ता हा आधीच निश्चित केलेला असतो.
टॅग्स :Metroमेट्रोPakistanपाकिस्तानchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय