या आहेत जगातील सर्वात मोठ्या नॉन स्टॉप फ्लाइट, अवघ्या काही तासांत कापतात हजारो किमी अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:13 IST
1 / 6जगातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विमान प्रवास हे सोईस्कर प्रवास साधन बनले आहे. काही लांब पल्ल्याच्या विमानफेऱ्या तर काही तासांमध्ये हजारो किमी अंतर पार करत असतात. अशाच विमानफेऱ्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 2 / 6कतार एअरवेजची सर्वात मोठी नॉन स्टॉप फ्लाइट दोहा ते ऑकलंड हे 14 हजार 536 किमी अंतर अवघ्या 18 तासांत पार करते. ही जगातील सर्वात मोठी नॉनस्टॉप फ्लाइट आहे. 3 / 6क्वांटास एअरलाइन्सची पर्थ ते लंडन ही फ्लाइट 14 हजार 500 किमी अंतर अवघ्या 17 तास 20 मिनिटात पार करते. 4 / 6एमिरेट्स एअरलाइन्सची दुबई ते ऑकलंड दरम्यान चालणारी विमान फेरी जगातील तिसरी सर्वात मोठी फ्लाइट आहे. ही विमान फेरी 17 तास 15 मिनिटांमध्ये 14 हजार 200 किमी अंतर कापते. 5 / 6युनायटेड स्टेट फ्लाइटची लॉस एन्जलीस ते सिंगापूर दरम्यानची विमानफेरी 17 तास 50 मिनिटांमध्ये 14 हजार 114 किमी अंतर कापते. 6 / 6युनायटेड स्टेट एअरलाइन्सची ह्युस्टनहून सिडनीला जाणारी विमान फेरी 17 तास 30 मिनिटांमध्ये 13 हजार 834 किमी अंतर कापते.