शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 21:16 IST

1 / 6
ऑक्सिओम-४ मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांचे इतर सहकारी आज सुखरूप पृथ्वीवर पोहोचले आहेत. त्यांना घेऊन येणारं ड्रॅगन हे अंतराळयान कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो येथील समुद्र किनाऱ्यावर उतरलं. दरम्यान, हे यान उतरलं तेव्हा त्याचा काही भाग जळालेला दिसला. आता हे यान अंतराळातून पृथ्वीवर येताना त्याच्यासोबत नेमकं काय काय घडलं याची माहिती समोर आली आहे.
2 / 6
शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना पृथ्वीवर घेऊन येणाऱ्या ड्रॅगन या यानाला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना प्रचंड घर्षणाचा सामना करावा लागला. त्यामुळे यानाच्या बाह्य भागाचं तापमान प्रचंड वाढून तो तापून लाग झाला. तसेच आगीसारखी स्थिती निर्माण होऊन तापमान १६०० ते २००० डिग्री एवढं प्रचंड वाढलं. मात्र तरीही हे यान आणि आतील अंतराळवीर सुरक्षितरीत्या पृथ्वीवर पोहोचले.
3 / 6
अंतराळातून यानाला पृथ्वीवर सुखरूप यावं यासाठी एक विशिष्ट्य तंत्रज्ञान वापरलं जातं. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना निर्माण होणारी प्रचंड उष्णता आणि त्यापासून लागणाऱ्या आगीपासून यानाचा बचाव करण्यासाठी यानाच्या बाह्य भागावर एक विशेष प्रकारची हीट शिल्ड लावली जाते. तिला पिका एक्स असं म्हणतात. हे पिका एक्स वातावरणात प्रवेश करताना होणाऱ्या घर्षणामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता आणि आगीपासून बचाव करण्यासाठी यानाच्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
4 / 6
पिका-एक्स हा पदार्थ उष्णतेमुळे वितळून जळतो. मात्र यादरम्यान, तो यानाच्या पृष्टभागावरील आपली जागा हळुहळू सोडतो. तसेच या शिल्डच्या खाली थर्मल इन्सूलेशन सिस्टिम असते. जी उर्वरित उष्णतेला शोषून घेते. त्यामुळे यानातील तापमान नियंत्रणात राहते. तसेच आतमधील अंतराळवीर सुरक्षित राहतात. त्यांना बाहेरील प्रचंड उष्णतेची जाणीवही होत नाही.
5 / 6
दरम्यान, अंतराळयानाला अंतराळातून पृथ्वीच्या वातावणात प्रवेश करताना प्रचंड घर्षणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे यानाला घर्षणाचा जास्त सामना करावा लागू नये यासाठी या यानाला वातावरणामध्ये विशिष्ट कोनातून आणले जाते. मात्र यानाची गती अधिक असल्यामुळेही प्रचंड उष्णता निर्माण होते. त्यामुळे डीऑर्बिट बर्न करून यानाचा वेग कमी करून घर्षणाचं प्रमाण नियंत्रणात आणलं जातं.
6 / 6
वरील कारणांमुळेच जेव्हा अंतराळ यान पृथ्वीवर उतरतं तेव्हा त्याच्या बाहेरील भाग जळालेल्याच्या खुणा दिसतात. तसेच काही ठिकाणी पृष्टभाग काळा पडलेला असतो. मात्र जेव्हा यान अंतरळात जात असतं तेव्हा रॉकेट हे हळुहळू वेग पकडतं. तसेच वर जाताना वातावरण विरळ होत जातं. त्यामुळे यानाला अधिक तापमानाचा सामना करावा लागत नाही.
टॅग्स :scienceविज्ञानNASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञान