शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युद्ध लांबले, बाजी पलटली, युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियाची माघार, समोर येतंय असं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:56 IST

1 / 9
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आता या युद्धामध्ये बाजी पलटताना दिसत आहे. सुरुवातीला रशियाच्या आक्रमणासमोर भरडल्या गेलेल्या युक्रेनने बाजी पलटवल्याचे चित्र दिसत आहे. अनेक भागातून रशिय सैनिक माघार घेत असून, सुमारे ६ हजार चौकिमी भूभाग परत मिळवल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे.
2 / 9
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे काही फोटो समोर आले आहेत. ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान, घेतलेला हा फोटो युक्रेनच्या सशस्त्र दलांचे कमांडर इन चिफ यांनी प्रसिद्ध केला आहेत. खारकिव्ह क्षेत्रातील उकारियन भागातील आहे. येथे युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियन तोफा आणि वाहनांची अशी दुर्दशा झाली आहे.
3 / 9
१० मे रोजी घेतलेल्या या फोटोमध्ये युक्रेनच्या लिसिचन्स्कजवळ एका नष्ट झालेल्या घराजवळ रशियन सैन्याचे नष्ट झालेले एक वाहन दिसत आहे. हे आता युक्रेनच्या ताब्यात आहे.
4 / 9
युक्रेनच्या सैनिकांनी जेव्हा खारकिव्ह रशियाच्या ताब्यातून परत मिळवले. तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. माला रोगनच्या गावामध्ये रशियन सैन्याचे हे वाहन परिस्थितीचं चित्र दाखवण्यासाठी पुरेसं आहे.
5 / 9
हा फोटो ६ मार्च २०२२ रोजीचा आहे. युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार या फोटोचं लोकेशन पूर्व खारकिव्हमधील एका जंगलातील आहे. येथे रशियाचे सैनिया आपली अनेक वाहने सोडून पळून गेले.
6 / 9
हा फोटो थोडा जुना आहे. मात्र रशियाच्या सरेंडरचं चित्र दाखवण्यासाठी पुरेसं आहे. या फोटोत एक युक्रेनी सैनिक माला रोगन गावाजवळ नष्ट झालेल्या रशियन सैन्याच्या वाहना शेजारी युद्धसामुग्रीचं निरीक्षण करताना दिसत आहे.
7 / 9
हल्लीच युक्रेनमधील एजन्सीने रशियन सैन्याच्या माघारीबाबत जो फोटो जारी केला आहे. हा त्यामधील एका आहे. यामध्ये युक्रेनी सैनिक प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत पकडल्या गेलेल्या एका रशियन आर्म्स फायटर व्हेईकल्सला आपल्या ताब्यात घेऊन जाताना दिसत आहे.
8 / 9
अनेक ठिकाणी असेही दिसत आहे की, रशियन सैन्य मोठ्या संख्येने दारुगोळा सोडून पळत आहेत. तसेच युक्रेनचे सैन्य त्यावर कब्जा करत आहे. तसेच रशियाची हत्यारेच रशियाविरुद्ध वापरत आहेत.
9 / 9
अनेक परिसरात रशियन सैनिक पाठ दाखवून पळाले आहे. प्राण वाचवण्यासाठी ते आपली हत्यारे आणि आर्म्ड फायटर व्हेईकलसुद्धा सोडून जात आहेत.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध