६९ वर्षांचे Vladimir Putin स्वत:ला असं ठेवतात फिट, अशी आहे त्यांची लाईफस्टाईल आणि तंदुरुस्तीचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:27 IST
1 / 9रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये समावेश होतो. पुतीन काल ६९ वर्षांचे आहेत. स्टॅलिननंतर जर कुठल्या दुसऱ्या रशियन नेत्याने जागतिक ओळख आणि दबदबा निर्माण केला असेल तर ते व्लादिमीर पुतीन आहेत.2 / 9व्लादिमीर पुतीन यांचा जन्म लेलिनग्राडमध्ये झाला होता. त्यांचे बालपण खूप हालाखीच्या परिस्थितीत गेले. पुतीन यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्याशिवाय पुतीन योग, खेळ आणि घोडेस्वारीमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. या सर्वांमुळे पुतीन यांची माचो मॅन अशी ओळख निर्माण झालेली आहे.3 / 9कठीण परिस्थितीत लॉमध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुतीन यांनी रशियन गुप्तचर संघटना असलेल्या केजीबीमध्ये कामाला सुरुवात केली. केजीबीतील कामामुळे त्यांना लवकरच राजकारणाचे दरवाजे उघडले. त्यानंतर त्यांनी आपल्या दीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 4 / 9केजीबीमध्ये गुप्तचर अधिकारी म्हणून १५ वर्षे काम केल्यावर १९९० च्या दशकामध्ये पुतीन यांनी राजकारणात पाऊल ठेवले. १९९७ मध्ये ते राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांच्या सरकारमध्ये सामील झाले. तिथे त्यांना पंतप्रधान बनवण्यात आले. 5 / 9१९९९ मध्ये येल्तसिन यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुतीन कार्यकारी राष्ट्रपती बनले. त्यानंतर २००० आणि २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रपती निवडणूक जिंकली. रशियन घटनेनुसार तिसऱ्यांदा निवडणूक लढता येत नसल्याने ते पुढे २०१२ मध्ये पुन्हा राष्ट्रपती बनले. त्यानंतर २०१८ मध्ये ते चौथ्यांदा रशियाचे राष्ट्रपती बनले.6 / 9व्लादिमीर पुतीन दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक सक्रिय असतात. ते आपले बहुतांश काम रात्री उशिरा करतात. त्यांच्या मते रात्रीच्या वेळी ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. 7 / 9पुतीन यांना घोडेस्वारीची खूप आवड आहे. ते आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घोडेस्वारी करणे पसंत करतात. 8 / 9पुतीन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये नियमित व्यायाम आणि स्विमिंग करतात. ते दररोज दोन तास स्विमिंग आणि एक तास जिममध्ये वर्कआऊट करतात. 9 / 9पुतीन त्यांच्या ब्रेकफास्टला खूप महत्त्व देतात. सकाळी उठल्यानंतर ते सर्वप्रथम ब्रेकफास्ट करतात. ब्रेकफास्टमध्ये ते अंडी, डाळ आणि ज्यूस घेतात.