इंडोनेशियातल्या समुद्राच्या मधोमध असलेलं हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 22:45 IST
1 / 5जगभरात अनेक मंदिरं आहेत, परंतु सध्या इंडोनेशियातलं एक मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. 2 / 5इंडोनेशिया देशातल्या बालीमध्ये समुद्राच्या मधोमध हे मंदिर स्थित आहे. समुद्रात असलेल्या 7 मंदिरांपैकी हे एक पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतं. 3 / 5बालीमधल्या दक्षिण पश्चिम तटावर हे मंदिर वसलेलं आहे. 15व्या शतकापासून आपलं अस्तित्व टिकवून असलेलं हे मंदिर पर्यटकांना आकर्षून घेतं. 4 / 5समुद्रातील एका मोठाल्या खडकावर असलेल्या मंदिरांत भाविकांची रिघ असते. एका पुजा-यानं मच्छीमारांच्या मदतीनं या मंदिराची उभारणी केली होती. 5 / 5बालीतल्या समुद्र देवाला वाहून घेतलेलं हे मंदिर बालीच्या पौराणिक संस्कृतीचं एक अभिन्न अंग आहे.