By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 11:29 IST
1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू असून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. तसेच खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 3 / 14कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. लसीकरणाची मोहीम सुरू असतानाच दक्षिण कोरियातून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. 4 / 14योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी सेऊलच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळील गोयांग रुग्णालयात मंगळवारी सकाळी 50 रुग्णांना कोरोना लस देण्यात आली होती. मृत्यू झालेला रुग्ण याच 50 जणांपैकी एक होता.5 / 14कोरोना लस घेतल्यानंतर दुपारी या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यावेळी त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. 6 / 14आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे झाला का, याचा तपास करण्यात येत आहे. या रुग्णाला मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार होते. तर, दुसऱ्या एकाचा मृत्यूही करोनाची लस घेतल्यानंतर झाला आहे.7 / 14एस्ट्राजेनका कंपनीने यावर कोणतेही भाष्य केले नाही. तर, डेली मेलने नवीन निष्कर्षांचा हवाला देत ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची जोखीम 90 टक्के कमी होत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 14इस्रायलमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोनामुळेच बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 9 / 14मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला इस्रायलच्या मीर मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. महिलेला दोन दिवस ताप येत होता आणि तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणं आढळली होती. 10 / 14इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 'ही एक दुर्मिळ घटना आहे आणि इस्रायलमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे' अशी माहिती दिली. मीर मेडिकल सेंटरचे डॉक्टर ब्रोश यांनी वाईनेट वेबसाइटशी संवाद साधताना कोरोना व्हायरसमुळेच बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे असं म्हटलं आहे.11 / 14संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.12 / 14संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.13 / 14रिपोर्टनुसार, कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. आरोग्यासंबंधित समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं दिसून आता नव्या रिसर्चमधून दिसून आलं आहे.14 / 14फक्त कोरोना लसच नाही तर याआधीदेखील काही लशींनी अशीच कमाल केली होती. काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट समोर येत असताना या माहितीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.