By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 19:44 IST
1 / 8उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग ऊन हा त्याच्या क्रूर कृत्यांसाठी ओळखला जातो. छोटीशीही चूक झाल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना, अधिकाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यास तो मागेपुढे पाहत नाही. मात्र असा हा क्रूरकर्मा असलेल्या किम जोंग उनने चक्क माफी मागितल्याचे तसेच माफी मागताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळल्याचा अनपेक्षित प्रकार समोर आला आहे. 2 / 8द गार्जियन या वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार किम जोंग उनने कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यात अपयश आल्याने देशवासियांची माफी मागितली. माफी मागितल्यानंतर किम जोंग डोळ्यांतील अश्रू पुसत असल्याचेही दिसले. 3 / 8आपल्या पक्षाच्या ७५ व्या वर्धापनदिनी संबोधित करताना किम जोंग उन भावूक झाला. उत्तर कोरियाई जनतेच्या अपेक्षांना मी पात्र ठरू शकलो नाही, त्यासाठी मी माफी मागतो, असे तो म्हणाला. त्यानंतर किम जोंगने चष्मा काढला आणि तो अश्रू पुसू लागला, असे वृत्तात म्हटले आहे.4 / 8आपल्या पूर्वजांच्या वारशाचा उल्लेख करत किम जोंग म्हणाला की, किम २ संग आमि किम जोंग इल यांच्या महान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देशातील लोकांनी मला ही जबाबदारी सोपवली आहे. मात्र माझे प्रयत्न आणि गांभीर्य लोकांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. मला याचा खेद वाटतोय. 5 / 8किम जोंग उनचे अशाप्रकारे भावूक होणे हे दाखवते की, कोरोना विषाणूची साथ आणि परमाणू हत्यारांबात लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या नेतृत्वावर खूप दबाव आहे. 6 / 8आपल्या भावूक भाषणादरम्यान, किम जोंग उनने कोरोना विषाणूच्या साथीमुळे संपूर्ण जगावर आलेल्या संकटाचा उल्लेख केला. किम जोंग ने या भाषणामधून दक्षिण कोरियासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छाही व्यक्त केली.मात्र किम जोंगने या भाषणात अमेरिकेवर थेटपणे टीका केली नाही. 7 / 8दरम्यान, शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात उत्तर कोरियाने सैन्य परेडमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले. ही क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. 8 / 8या सैन्य परेडबाबत दक्षिण कोरिाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच उत्तर कोरियाने आपल्या निशस्त्रीकरणाच्या वचनावर कायम राहावे, असे आवाहन केले आहे.