By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 22:27 IST
1 / 7पश्चिम आशियात दोन आठवड्यांसाठी झालेला युद्धविराम खरंच टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होणारे काम इस्रायलने केले आहे. इस्रायलच्या याच हल्ल्यांमुळे इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता इस्रायलने लेबनानमधील अनेक शहरांवर मिसाईल्सचा वर्षाव केला.2 / 7संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तालयाने लेबनानमधील हल्ल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात इस्रायलच्या हल्ल्यात रहिवाशी इमारतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. हे सगळे फोटो थरकाप उडवणारे आहेत.3 / 7इस्रायलने बैरूमध्येच ६० पेक्षा जास्त हवाई हल्ले केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. अवघ्या दहा मिनिटांत हा विध्वंस इस्रायलने घडवला आहे. यात बैरुतमध्ये सर्वाधिक बेघर झालेले लोक मारले गेले आहेत.4 / 7लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ८९ लोक मारले गेले आहेत, तर ७०० लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.5 / 7अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेकडो लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयांमध्ये नेण्यात आले मात्र रुग्णालयांमध्येही दाखल करण्यासाठी जागा अपुरी पडली.6 / 7कोणतीही सूचना न देता इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराण खवळला आहे. इराणने अमेरिकेला शस्त्रसंधी करारातून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलकडून हे हल्ले हिजबुल्लाहला निशाणा बनवत करण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. 7 / 7इस्रायलच्या लेबनानमधील हल्ल्यांमुळे युद्धाला पुन्हा तोंड फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका इराणने दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केल्यानंतर इस्रायलने हा रक्तपात घडवला आहे.