आलिशान राजवाडा, महागड्या गाड्या अन्...किती आहे शेख तहमीम यांची संपत्ती? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 22:01 IST
1 / 8 Sheikh Tamim Bin Hamad Al-Thani: कतारचे अमीर शेख तहमीम बिन हमाद अल थानी 17-18 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या दशकातील त्यांची ही पहिलीच भारत भेट असून, पंतप्रधान मोदींनी त्यांना आमंत्रित केले आहे. 2 / 8 त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात भारत आणि कतारमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यासोबतच व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांनाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.3 / 8 कतारमधील सर्वोच्च शासकाला अमीर म्हटले जाते. दरम्यान, कतारचे अमीर शेख तहमीम बिन हमाद अल थानी हे जगातील नववे सर्वात श्रीमंत राजा आहेत. त्यांच्याकडे सुमारे 335 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. शेखला तीन लग्नांतून 13 मुले आहेत. शेख तमीम बिन हमाद अल थानी 2023 मध्ये कतारचे अमीर बनले.4 / 8 ते दोहा येथील 100 हून अधिक खोल्या असलेल्या रॉयल पॅलेसमध्ये राहतात. या महालाची किंमत सुमारे 1 अब्ज डॉलर्स आहे. हा राजवाडा इतका आलिशान आहे की, त्यातील काही भाग सोन्याने मढवलेला आहे. इतकंच नाही तर 500 कार पार्किंग सुविधांसोबतच या पॅलेसमध्ये 124 मीटर लांबीची नौकाही आहे, ज्याची किंमत सुमारे 3.3 अब्ज रुपये आहे. याशिवाय, महालात हेलिपॅडही आहे.5 / 8 शेख तहमीमला लक्झरी गाड्यांचाही शौक आहे. त्यांच्याकडे रोल्स रॉइसपासून बुगाटी, लॅम्बोर्गिनी आणि फेरारीपर्यंतच्या कार आहेत. 3 जून 1980 रोजी जन्मलेला शेख तमीम हे माजी अमीर हमद बिन खलिफा अल-थानी यांचा चौथा मुलगा आहे. त्यांनी लंडनमधील हॅरो स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर 1998 मध्ये इंग्लंडच्या रॉयल मिलिटरी अकादमीमधून पदवी पूर्ण केली.6 / 8 कतारचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त- दोन्ही देशांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले, तर भारताचा जीडीपी 4.27 ट्रिलियन डॉलर आहे, तर कतारचा जीडीपी 240 बिलियन डॉलर्स आहे. 7 / 8 असे असूनही, कतारचे दरडोई उत्पन्न $114,648 आहे. याचा अर्थ दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत कतार सध्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे. कतारचे चलन कतारी रियाल आहे, जे सुमारे 23 भारतीय रुपयांच्या बरोबरीचे आहे.8 / 8 कतारचा हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत - कतारमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचे गॅसचे साठे आहेत. रशिया पहिल्या तर इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. कतार जगाला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू निर्यात करतो आणि त्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमधून येतो.