दगाबाज रे... पुतिनच्या गर्लफ्रेंडचं सिक्युरिटी गार्डशी अफेअर! युद्ध सुरू असताना रोमान्सची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 19:51 IST
1 / 8Russian President Putin girlfriend Alina Kabayeva Affair: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुतीन यांची कथित गर्लफ्रेंड अलिना काबाएवा हिच्या अफेअरच्या बातम्यांच्या पाश्चिमात्य मीडियात चर्चा सुरू आहेत.2 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेली मिररने युक्रेनच्या मीडिया रिपोर्ट्सचा हवाला दिला आहे की, पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचे त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकासोबत अफेअर आहे. रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असल्याने राष्ट्राध्यक्ष पुतिन अलिनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.3 / 8असे सांगितले जात आहे की याआधीही अशा बातम्या आल्या होत्या की अलिना तिच्या चार मुलांसह स्वित्झर्लंडमध्ये राहत आहे. या मुलांचे वडील पुतिन असल्याचा दावा करण्यात आला आहे.4 / 8टेलिग्राम चॅनल जनरल एसव्हीआरचा दावा आहे की पुतिनच्या वैयक्तिक आयुष्यात सारं काही आलबेल नाही. युक्रेनियन मीडिया आउटलेट obozrevatel.ed नुसार पुतिन यांना अलिना यांच्या अफेअरची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यांनी याकडेही दुर्लक्ष केले आहे.5 / 8पुतिन यांनी या बातमीत रस दाखवला नाही आणि आपल्या कथित प्रेयसीचा प्रियकर कोण आहे, हे शोधण्याचा प्रयत्नही केला नाही असेही बोलले जात आहे.6 / 8२००८ मध्ये एका वृत्तपत्राने पहिल्यांदा दोघांच्या संबंधांबाबतची बातमी दिली होती. तथापि, पुतिन किंवा काबाएवा दोघांनीही एकमेकांशी संबंध असल्याचे कबूल केले नाही.7 / 8गेल्या काही वर्षांपासून, दोघांना मॉस्कोमध्ये केंद्र सरकारच्या औपचारिक कॉरिडॉरमध्ये अनेकदा एकत्र पाहिले गेले. त्यामुळे अशा गोष्टींना अधिक खतपाणी मिळाले.8 / 8दरम्यान, अलिना ही एक यशस्वी जिम्नॅस्ट आहे. काबाएवा एक निवृत्त जिम्नॅस्ट आहे. 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप पदके आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदकांसह ती लयबद्ध जिम्नॅस्टिक्सच्या दमदार नावांपैकी एक जिम्नॅस्ट मानली जाते.