शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

हलक्यात घेऊ नका, संकट ओढावलं तर अणुहल्ला देखील करू; पुतीन यांची अमेरिकेला उघड धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 15:08 IST

1 / 7
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आता सातव्या महिन्यात प्रवेश करणार असून हे युद्ध काही लवकर संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. यात राष्ट्राला संबोधित करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी अमेरिकेसह पाश्चात्य देशांना उघड धमकी दिली आहे.
2 / 7
अण्वस्त्र हल्ल्याचा इशाऱ्याला हलक्यात घेऊ नका, हे काही नाटक नाही. गरज पडली तर रशिया अण्वस्त्र हल्ला देखील करेल, असं रोखठोक विधान व्लादिमीर पुतीन यांनी केलं आहे.
3 / 7
पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपला मोठी धमकी दिली आहे. अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेऊ नये, असे पुतीन म्हणाले. अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा हे नाटक नाही. रशियाला कोणत्याही प्रकारचा धोका असेल तर आम्ही अण्वस्त्र हल्ला करू आणि आमच्याकडे नाटोहून अधिक प्रगत शस्त्रं उपलब्ध आहेत, असंही पुतीन म्हणाले.
4 / 7
पुतिन म्हणाले की, जर रशियाच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण झाला तर मॉस्को सर्व संभाव्य उपाययोजनांसह प्रत्युत्तर देईल. त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी सांगितले की 300,000 सैनिकांच्या तैनातीची योजना आखण्यात आली आहे.
5 / 7
रशियाही युक्रेनबाबत जनतेचं मत जाणून घेण्याची तयारी करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी बुधवारी देशाला संबोधित केलं. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर पुतिन यांनी राष्ट्राला केलेलं हे पहिलंच संबोधन होतं. पुतीन यांनी देशातील जनतेला युक्रेनमधील लष्कराची सद्यस्थिती आणि तेथील परिस्थितीची जाणीव करून दिली.
6 / 7
दुसरीकडे, अमेरिकेने रशियन-व्याप्त पूर्व आणि दक्षिण युक्रेनवर सार्वमत घेण्याच्या रशियाच्या योजनेला 'नाटक' म्हटले आणि 'सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वाचा अपमान' असा उल्लेख केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी दावा केला की सार्वमत चाचणीत फेरफार केला जाईल. युक्रेनच्या कोणत्याही भागावर कथित कब्जा केल्याचा रशियाच्या दाव्याचं अमेरिका कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही, असंही ते म्हणाले.
7 / 7
'रशियाकडून सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांचा अपमान होत आहे', असं सुलिव्हन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं. “आम्हाला माहित आहे की रशियाकडून सार्वमत चाचणीत फेरफार केले जातील. रशिया लवकरच किंवा नंतर या बनावट सार्वमताचा वापर त्या प्रदेशांना जोडण्यासाठी करेल', असं ते म्हणाले.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया