1 / 10रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांचे जीवन रहस्यमय आहे. पुतिन यांच्या तब्येतीबाबत, जीवनाबाबत आणि रणनीतीबाबत काही मोजक्याच लोकांनाच माहिती असते. आता पुतिन यांच्याबाबत ब्रिटनच्या गुप्तचर संघटनेने खळबळजनक दावा केला आहे. 2 / 10एका रिपोर्टमध्ये अधिकाऱ्यांनी पुतिन यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत पुतिन यांच्यासारखाच दिसणाऱ्या व्यक्तीने सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची जागा घेतल्याचाही दावा करण्यात आला आहे. 3 / 10ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांच्या साथीदारांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य जगापासून अनेक आठवडे किंवा महिने लपवावे लागेल. डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, एका गुप्तचर सूत्राने सांगितले की, पुतिन यांच्या अलीकडील सार्वजनिक उपस्थितीचे पूर्व-रेकॉर्डिंग असण्याची शक्यता आहे. तो बहुधा मेला आहे आणि त्याच्या जागी पुतिनप्रमाणे दिसणाऱ्या चेहऱ्याचा व्यक्ती उभा केला आहे. 4 / 10'पुतिन अत्यंत आजारी आहेत आणि जर त्यांचा मृत्यू झाला तर ते अनेक आठवडे किंवा महिने गुप्त ठेवले जाईल,' असं सूत्रांनी डेलीस्टारला सांगितले. ते आधीच मरण पावले असण्याचीही शक्यता आहे. ते शोधणे अशक्य आहे. 5 / 10असे मानले जाते की, पुतिन जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी त्यांच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीचा वापर केला होता आणि आता क्रेमलिन तेच करत आहे. सूत्राने सांगितले की, पुतिन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका लहान गटाचे प्रमुख आहेत जे त्यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत.6 / 10'त्याच्या जवळच्या मित्रांना सर्वात मोठी भीती ही आहे की पुतिन यांच्या मृत्यूची बातमी बाहेर येताच रशियामध्ये सत्तापालट होऊ शकतो आणि रशियन जर्नल युक्रेनमधून सैन्य मागे घेईल,' असं बातमीत सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे. 7 / 10पुतिन यांच्या मृत्यूमुळे ते कमकुवत आणि सत्तेतून बेदखल होतील. त्यामुळे पुतिन यांना जिवंत सांगणे त्यांच्या हिताचे आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, एक रशियन अब्जाधीश व्यापारी आणि क्रेमलिनच्या विश्वासपात्राने दावा केला होता की पुतिन ब्लड कॅन्सरने ग्रस्त आहेत आणि ते अत्यंत आजारी आहेत. एवढेच नाही तर युक्रेन हल्ल्यापूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.8 / 10त्याच वेळी, MI6 एजंट म्हणतो की, पुतिन यांच्या ढासळलेल्या तब्येतीमुळे त्यांची सत्तेवरची पकड कमकुवत होत आहे. पुतिन त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे सत्तेवरची पकड गमावत आहेत आणि क्रेमलिनला 'अव्यवस्था आणि अराजकता' मध्ये बुडवत आहेत असं ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे माजी गुप्तहेर ख्रिस्तोफर स्टील यांनी असा दावा केला आहे 9 / 10रशियातील MI6 एजंट असलेल्या स्टीलने असा दावा केला की पुतिन यांना उपचारासाठी वारंवार विश्रांती घ्यावी लागते आणि मॉस्कोमध्ये प्रभावीपणे 'कोणतेही स्पष्ट राजकीय नेतृत्व' नाही. अलीकडेच पुतिन यांची हत्या होऊ शकते अशीही भविष्यवाणी करण्यात आली आहे. 10 / 10मिरर वृत्तानुसार कांटोनिस्टोवने भविष्यवाणी केली आहे की, विषबाधा अथवा शारिरीक छळसारख्या प्रकाराने गरमीच्या अखेरपर्यंत पुतिन यांची हत्या होऊ शकते. जूनच्या सुरुवातीपासून पुतिन यांच्या आयुष्यात सर्वात कठीण काळ सुरू होईल.