Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाचा खतरनाक प्लॅन; इमारतींवर चित्रविचित्र खुणा, काय आहे याचं रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:13 IST
1 / 7रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भयानक स्थितीत पोहोचले आहे. रशियाकडून युक्रेनमधील प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे. रशियन विमानांकडून सातत्याने बॉम्बहल्ले केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हमधील अनेक इमारतींवर रहस्यमय खुणा दिसत आहेत. 2 / 7या खुणा रशियन विमानांना कुठल्या इमारतीवर हल्ला करायचा आहे, हे सांगण्यासाठी केल्या जात आहेत, अस आंदाज आहे. इमारतींवर केलेल्या या खुणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अशा परिस्थितीत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 3 / 7किव्हमधील अनेक इमारतींवर लाल आणि नारिंगी क्रॉयहेअर रंगवण्यात आले आहेत. या इमारतींमध्ये अनेक उंच इमारतींचा समावेश आहे. दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना इमारतींचे छत पाहण्याची आणि अशा खुणा आढळल्यास सुरक्षित ठिकाणी लपण्याची सूचना दिली आहे. 4 / 7उल्लेखनीय बाब म्हणजे यामधील काही खुणा युव्ही लाईटमध्येही दिसून येतात. किव्हच्या महापौरांनीही या खुणा म्हणजे टार्गेटचं लोकेशन असल्याच्या दाव्याल दुजोरा दिला आहे. त्यांनी लोकांना अशा खुणांबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 5 / 7रशियाकडून किव्हमध्ये जोरदार बॉम्बफेक केली जात असतानाच या खुणांची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रशियाने लोकांना सुरक्षेसाठी आधीच शहर सोडण्याचा सल्ला दिला आहे. 6 / 7रशियाकडून अशाच पद्धतीचा वापर हा सिरीयामध्ये करण्यात आला होता. त्यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना सुरक्षित रस्त्यांनी शहर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर रशियन सैन्याने सिरीयाच्या सैन्यासोबत मिळून शहरांवर जोरदार बॉम्बफेक केली होती. 7 / 7दरम्यान, युक्रेनमधील किव्ह, खारकिव्ह, जाइटॉमिर,. चेर्निहाइव्ह या शहरांवर आधीच रशियन सैन्याने बॉम्बफेक केली आहे. त्यामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.