1 / 6कुत्रे हे माणसाचे चांगले मित्र असतात, ही बाब वारंवार सिद्ध होत असते. रशिया युक्रेन युद्धातही ही बाब अधोरेखित झाली आहे. या युद्धादरम्यान, एका कुत्र्याने शौर्याचा परिचय देताना शेकडो जणांचे प्राण वाचवले. पेट्रन असे या कुत्र्याचे नाव असून, त्याने अनेक भूसुरुंग शोधून युक्रेनच्या सैन्याला मदत केली आहे. आता झेलेन्स्की यांनी त्याचा पदक देऊन सन्मान केला आहे. 2 / 6युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी हल्लीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या युक्रेन दौऱ्यादरम्यान पेट्रन आणि त्याच्या हँडलरना पदक दिले. 3 / 6जॅक रसेट टेरियर ब्रिडच्या स्निफर डॉन पेट्रनने २०० हून अधिक लँडमाईन शोधून काढले. युद्धादरम्यान, अनेक हल्ले रोखण्याचं श्रेय त्याला दिलं जातं.4 / 6पेट्रनचा गौरव होत असताना सभागृहाने टाळ्या वाजवून त्याच्या कार्याचं कौतुक केलं. 5 / 6यावेळी झेलेन्स्की यांनी सांगितले की, मी त्या युक्रेनी नायकांना पुरस्कृत करू इच्छितो, जे आमच्या भूमीला सुरक्षित ठेवत आहेत. ज्या भागाता भूसुरुंगाचा धोका आहे, अशा भागात आमच्या मुलांना सुरक्षेबाबतचे नियम शिकवण्याचं कामही पेट्रन करत आहे. 6 / 6आता पेट्रन हा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.