1 / 6Russia Ukraine War : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाला अनेक दिवस लोटून गेले असून यात युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख झाली आहेत. 2 / 6तरी युक्रेन यात पराभव स्वीकारण्यास तयार नाही. तर दुसरीकडे रशियाकडूनही अद्याप हल्ले थांबलेले नाहीत. परंतु आता रशियानं एक मोठा दावा केला आहे. युक्रेनकडून रशियावर हल्ला केल्याचा दावा रशियानं केला आहे.3 / 6यात एका रशियन व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच यात एक अल्पवयीनदेखील सामील असल्याचं म्हटलं आहे.4 / 6युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी आतापर्यंत रशियाला युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही. खारकीव, मारियूपोल, सुमी यासारख्या शहरांना रशियानं बेचिराख केलं आहे. असं असलं तरी रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळवता आलेला नाही. 5 / 6पुतिन यांच्या लष्कराने अनेक प्रयत्न केल्यानतंरही त्यांना कीव्हमध्ये दाखल होता आलेलं नाही. म्हणून यानंतर त्यांनी आपलं लक्ष डोनबासवर केंद्रित केलं आहे.6 / 6डोनबास हा युक्रेनमधील तो भाग आहे ज्याच्या लुहान्सक आणि डोनेस्क या भागांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वेगळ्या देशाच्या रुपात मान्यता दिली होती. या ठिकाणी काही फुटीरतावादी लोक राहत होते. त्यांच्या मदतीनं रशियन लष्कराला युक्रेनमध्ये शिरणं सोपं झालं.