1 / 6Putin assassination attempts: यूक्रेन विरूद्धच्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी खुलासा केला आहे की, त्यांच्यावर आतापर्यं ५ वेळा जीवघेणा हल्ला झाला आहे. आता पुतिन यांना आपल्या जीवाची भीती सतावत आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी एक स्नायपर्सची टिम तैनात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्षांवर ताजा हल्ला साधारण २ महिन्यांपूर्वी यूक्रेनसोबत युद्धाच्या सुरूवातीला झाला होता. ही बाब पहिल्यांदाच समोर आली आहे.2 / 6'द सन' च्या रिपोर्टनुसार यूक्रेनचे चीफ ऑफ डिफेन्स इंटॅलिजन्स कायरलो बुडानोव म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न फेल झाला होता. ते म्हणाले होते की, पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पण तो प्रयत्न फेल झाला होता. बुडानोव म्हणाले की, हा प्रयत्न साधारण दोन महिन्यांआधी करण्यात आला होता. पण ते म्हणाले की, यामागे कोण होतं आणि पुतिन यांच्यावर हल्ला कुठे झाला होता, याबाबत काही माहिती मिळाली नाही.3 / 6ब्रिटनच्या अजरबॅजानमध्येही पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे पुतिन आता फार सतर्क राहतात आणि कुठेही प्रवास करण्याआधी खूप विचार करतात. पुतिन यांचे स्नायपर सतत सतर्क राहतात आणि कोणत्याही धोक्याआधी दुश्मनाला पकडतात. रिपोर्ट्सनुसार, आता पुतिन यांना जेवण देण्याआधी त्यांचं जेवण एका टीमकडून चेक केलं जातं. पुतिन यांना भीती आहे की, त्यांना जेवणातून विष देऊन मारलं जाईल.4 / 6स्वीमिंगला जाण्याआधी पुतिन यांच्या पूलची बारकाईने तपासणी केली जाते. त्यांच्यावर केमिकल अटॅकचा धोकाही आहे. हेच कारण आहे की पूलमधील पाणी टेस्ट केलं जातं. म्हणजे आता रशियन राष्ट्राध्यक्षांना आंघोळीचीही भीती आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेवटच्या प्रयत्नाआधी ४ वेळा पुतिन यांना मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, चारही वेळा ते बचावले.5 / 6२००२ साली पुतिन यांच्यावर अजरबॅजान दौऱ्यावेळी हल्ला झाला होता. त्यानंतर एका इराकी व्यक्तीला हत्येचा प्लान करण्याबाबत अटक करण्यात आली होती. तेव्हा समोर आलं होतं की, आरोपीचं अफगाणिस्तानसोबत कनेक्शन आहे. याप्रकरणी इराकी व्यक्तीला १० वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २००२ मध्ये पुन्हा पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्यांच्या रूटमध्ये बॉम्ब ठेवून गाडी उडवण्याचा प्लान होता. पण हा प्रयत्नही फेल झाला.6 / 6२००३ मध्ये ब्रिटीश पोलिसांनी हत्येचा प्रयत्न हाणून पाडला होता. यात दोन संशयीतांना अटक करण्यात आली होती. पण दोन्ही आरोपींना शिक्षा मिळाली नाही. त्यानंतर २०१२ मध्ये चेचने विद्रोहींनी दावा केला होता की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येच्या प्रयत्नानंतर एका दहशतवाद्याला यूक्रेनच्या ओडेसामधून अटक करण्यात आली होती.