शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिका 'या' देशावर हल्ला करण्याच्या तयारीत? दररोज पाठवतायेत सैन्य, आतापर्यंत ७ युद्धनौका तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:34 IST

1 / 10
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची पूर्णपणे तयारी करत आहेत. या तेल उत्पादक देशाच्या जवळ अमेरिका सातत्याने त्यांच्या सैन्याची संख्या वाढवत आहे. एकीकडे अमेरिकन युद्धनौका शुक्रवारी रात्री अटलांटिक समुद्राच्या दिशेने जाताना दिसली.
2 / 10
ही तैनाती व्हेनेझुएलाच्या सागरी सीमेजवळील दक्षिण कॅरिबियन समुद्रात 'अमली पदार्थ तस्करी विरोधी मोहिमेचा' एक भाग आहे असं ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. कथाकथित ड्रग्स वाहतुकीला रोखण्यासाठी आतापर्यंत ७ युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यात काही क्रूझ मिसाईल लेंस आहेत. त्याशिवाय न्यूक्लियर पावर्ड सबमरीनही तैनात करण्यात आल्या आहेत.
3 / 10
अमेरिकेची युद्धनौका 'लेक एरी' गेल्या दोन दिवसांपासून रोडमन बंदरात पनामा कालव्याचे पॅसिफिक प्रवेशद्वाराजवळ उभी असल्याचे सांगितले जाते. सिग्नल मिळाल्यानंतर, ती पनामाच्या स्थानिक वेळेनुसार रात्री ९.३० वाजता अटलांटिककडे रवाना झाली. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर ड्रग्ज कार्टेल चालवण्याचा आरोप केला आहे आणि या भागातील ड्रग्ज तस्करांना तोंड देण्यासाठी लष्करी तैनाती करण्यात आली आहे. दुसरीकडे अमेरिकेकडून आमच्या देशालाच खरे लक्ष्य केले जात आहे असा दावा व्हेनेझुएलाच्या शासनाचा आहे.
4 / 10
राष्ट्रपती ट्रम्प त्यांच्या मागील कार्यकाळापासून निकोलस मादुरो यांच्यावर ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा आरोप करत आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या सरकारला बेकायदेशीर असल्याचे म्हटलं आहे. याच ऑगस्टमध्ये अमेरिकेने मादुरो यांना अटक करणाऱ्यांना बक्षीस म्हणून देणारी रक्कम दुप्पट करत ४४० कोटीहून अधिक केली होती. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कैरोलीन लीविट यांनी गुरुवारी मादुरो शासन बेकायदेशीर आहे. ते एक नार्को टेरर कार्टेल आहेत. मादुरो हा कायदेशीर राष्ट्रपती नाहीत तर या ड्रग्ज कार्टेलचा फरार नेता आहे अशी टीका केली होती.
5 / 10
आतापर्यंत अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची जाहीर धमकी दिलेली नाही, परंतु ट्रम्प यांच्या धमक्या प्रामुख्याने देशातील शक्तिशाली गुन्हेगारी टोळ्यांवर केंद्रित आहेत, विशेषतः कोकेन तस्करी करणाऱ्या 'कार्टेल डे लॉस सोल्स' वर, ज्याला ट्रम्प प्रशासनाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे आणि ज्याचे नेतृत्व मादुरो करत असल्याचा आरोप करतात.
6 / 10
सध्या सात अमेरिकन युद्धनौका आणि एक अणुऊर्जेवर चालणारी जलद हल्ला करणारी पाणबुडी या प्रदेशात आहेत, काही लवकरच पोहचण्याची अपेक्षा आहे, तसेच ४,५०० हून अधिक खलाशी आणि मरीन आहेत. अमेरिकन नौदलातील युद्धनौकांमध्ये यूएसएस सॅन अँटोनियो, यूएसएस इवो जिमा आणि यूएसएस फोर्ट लॉडरडेल यांचा समावेश आहे.
7 / 10
काही युद्धनौका हेलिकॉप्टरसारखी हवाई संसाधने वाहून नेऊ शकतात, तर काही टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यास देखील सक्षम आहेत. अमेरिकन सैन्याने अलीकडेच गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाण्यावरून उड्डाण करणारे पी-८ गुप्तचर विमाने या प्रदेशात तैनात केली आहेत.
8 / 10
ड्रग्ज कार्टेल्सशी लढणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच सांगितले आहे. हे लष्करी पाऊल त्या कार्टेल्सकडून येणाऱ्या धोक्यांना रोखण्यासाठी आहे असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा लष्करी तैनातीमुळे प्रत्यक्षात ड्रग्ज तस्करी किती प्रमाणात रोखता येईल हे अद्याप स्पष्ट नाही.
9 / 10
बहुतेक सागरी ड्रग्ज तस्करी पॅसिफिक मार्गाने अमेरिकेत पोहोचते, तर अमेरिकन सैन्य अटलांटिक प्रदेशात आहे. त्याशिवाय कॅरेबियनवरून येणारी खेप क्लॅडस्टाइन फ्लाइट्समधून अमेरिकेत एन्ट्री करतात असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आता अमेरिकन सैन्याचा वापर करून ड्रग्ज कार्टेल्स आणि क्रिमिनल ग्रुप्सविरोधात कारवाई केली जाईल असं ट्रम्प प्रशासनाने सांगितले. अमेरिकेच्या या पावलामुळे व्हेनेझुएलाच्या बाजूनेही काही तयारी केली जात आहे. सोमवारी कोलंबिया सीमेवर १५,००० सुरक्षा दल तैनात करण्याची घोषणा करण्यात आली, जेणेकरून ड्रग्स ट्रॅफिकिंग ऑपरेशन्स रोखले जाऊ शकते.
10 / 10
दुसऱ्या दिवशी व्हेनेझुएला सरकारने सांगितले की, ते ड्रोन आणि नौदलाच्या जहाजांद्वारे त्यांच्या सागरी क्षेत्राचे निरीक्षण करेल. अमेरिकेच्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून ४० लाखांहून अधिक मिलिशिया सदस्यांना सक्रिय करण्यात आल्याचा दावाही मादुरो यांनी केला आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPanamaपनामा