शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न व्हिडीओ, कोण, कुठून, काय बघतोय? पोर्नहबची सगळी माहिती हॅकर्संनी चोरली, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:52 IST

1 / 10
पोर्नहबवर जाऊन व्हिडीओ बघणाऱ्या कोट्यवधी यूजर्सची माहिती हॅकर्सच्या हाती लागलीये. ही माहिती कुणाची लीक झालीये, तर पोर्नहब प्रिमियम म्हणजे सबस्क्रिप्शन घेऊन वापरणाऱ्यांची. तब्बल २०० मिलियन नोंदी ईमेलसह हॅकर्स मिळवल्या आहेत.
2 / 10
पोर्नहबवर व्हिडीओ बघणाऱ्या लोकांची अत्यंत संवेदनशील माहिती लीक झाली आहे. परंतु कंपनीचं म्हणणं आहे की, ही माहिती त्यांच्या स्वतःच्या सिस्टममधून लीक झालेली किंवा हॅकर्संनी मिळवलेली नाहीये.
3 / 10
हॅकर्संनी पोर्न बघणाऱ्यांची ही माहिती मिळवली आहे, ती मिक्सपॅनेलकडून. मिक्सपॅनेल काय आहे, तर ही थर्ड पार्टी कंपनी आहे, जी संस्थांना त्यांच्या साईटवर येणाऱ्या लोकांची सर्चिंगच्या सवयी, त्यांच्या आवडी, निवडी, ते काय शोधतात...
4 / 10
थोडक्यात काय तर पॉर्न बघण्यासंदर्भातील त्यांची मानसिकता आणि वर्तन, त्यांनी काय शोधले त्याचा इतिहास, यूजर म्हणजे व्यक्ती आहे तो कोणत्या ठिकाणावरून ते बघत होता, याबद्दलचे विश्लेषण करणारी कंपनी. मिक्सपॅनेल अनेक टेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या वर्तनाची माहिती गोळा करण्यासाठी वापरतात.
5 / 10
पोर्नहबने २०२१ मध्ये मिक्सपॅनेलसोबत काम करणे थांबवले. पण जोपर्यंत मिक्सपॅनेल पोर्नहबसोबत काम करत होती, तोपर्यंतची माहिती त्यांच्याकडे होती. आता ग्राहकांचा हाच डेटा म्हणजे माहिती आता हॅकर्सच्या हाती लागली आहे. डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली ती ८ नोव्हेंबर रोजी. त्यानंतर याचा परिणाम ओपनएआयसह अनेक कंपन्यांवर झाला आहे.
6 / 10
अशा प्रकारची लोकांची माहिती लीक झाल्याचे पोर्नहबने १२ डिसेंबर रोजी सांगितले. व्हिडीओ बघणाऱ्या किती यूजर म्हणजे लोकांची माहिती किती उघड झाली याचा तपास सुरू केला आहे.
7 / 10
ब्लीपिंग कॉम्प्युटरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, शायनीहंटर्स नावाच्या हॅकिंग ग्रुपकडे ९४ जीबी पोर्नहब प्रीमियम वापरकर्त्यांचा डेटा आहे. यात कोणती माहिती आहे, तर लोकांचे ईमेल, पत्ते, पॉर्न पाहण्याच्या सवयी, कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघितले त्याचा इतिहास आणि कोणत्या ठिकाणावरून ते बघितले अशी सगळी माहिती हॅकर्सकडे आहे. ही माहिती किती लोकांची आहे, तर २० कोटींहून.
8 / 10
चोरलेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांनी कोणते व्हिडिओ डाउनलोड केले आहेत. त्यांच्या पॉर्न पाहण्याच्या आवडी निवडी म्हणजे या वेबसाईटवर आलेल्या कोणत्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे व्हिडीओ बघायला आवडतात. इतकंच नाही, तर त्याने कोणते व्हिडीओ सर्च केले, त्यासंदर्भातील शब्द, अशी सगळी माहिती या हॅकर्सच्या हाताला लागली आहे.
9 / 10
शायनीहंटर्स आता मिक्सपॅनेलशी संबंधित ग्राहकाना खंडणीचे ईमेल पाठवणे सुरू केले आहे, कंपन्यांनी खंडणी न दिल्यास चोरीची माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली जात आहे. अशी काही माहिती आपल्याकडे आहे, पटवून देण्यासाठी हॅकर्संनी पत्रकारांसोबत मोजका डेटा देखील शेअर केला आहे.
10 / 10
पोर्नहबची मूळ कंपनी आयलोच्या एका अधिकृत कर्मचारी खात्याने शेवटची माहिती २०२३ मध्ये अॅक्सेस केली होती. मिक्सपॅनेलचं म्हणणं आहे की जर हॅकर्सकडे आता हा डेटा असेल तर तो त्यांच्या सिस्टममधून लीक झालेला नाही. पोर्नहबचा असा दावा आहे की, हे सगळं लीक झाले मिक्सपॅनेलमधूनच आणि त्याचा परिणाम फक्त निवडक प्रीमियम सदस्यांवर झाला आहे.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम