शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: प्लाझ्मा स्प्रे! 30 सेकंदांत कोरोनाचे काम तमाम; महत्वाचे संशोधन

By हेमंत बावकर | Published: November 11, 2020 4:41 PM

1 / 10
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसची जगात दुसरी, तिसरी लाट येऊ घातली आहे. हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याबरोबरच व्हायरसचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
2 / 10
मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे.
3 / 10
एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोनाव्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे.
4 / 10
प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे. हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
5 / 10
जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.
6 / 10
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसयेथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसला मारण्यासाठी हा स्प्रे बनविला आहे. हा स्प्रे जास्त प्रेशरने जाण्यासाठी थ्री-डी प्रिंटरद्वारे जेट स्प्रे बॉटल बनविण्यात आली होती. हा स्प्रे प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि लेदरच्या वस्तू जसे की बास्केटबॉल, फुटबॉल आणि बेसबॉलआदीवर मारण्यात आला.
7 / 10
य़ा वस्तूंवर कोरोना व्हायरससह अन्य व्हायरसही टाकण्यात आले होते. या साऱ्या वस्तूंवरील सर्व व्हायरस मरण्य़ासाठी तीन मिनिटांचा कालावधी लागला. अनेक व्हायरस तर तीस सेकंदांत मारले गेले. यामध्ये कोरोनाचे व्हायरसही होते.
8 / 10
यानंतर मास्कवर लागलेले व्हायरसदेखील मरतात का ते पाहण्यात आले. यावरही हा स्प्रे खूप परिणामकारक ठरला आणि समान वेळेत या व्हायरसना नष्ट केले. या संशोधनाचे लेखक रिचर्ड ई. विर्ज यांच्यानुसार कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी प्लाझ्मा स्प्रेचा वापर खूपच उपयोगी ठरू शकतो.
9 / 10
ही केवळ सुरुवात आहे. भविष्यातील शोधात प्लाझ्मा आणखी परिणामकारक असेल याचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
10 / 10
हा प्लाझ्मा थेरपीमधला प्लाझ्मा नाही. तर हवेतील ऊर्जेने भारलेले अणू असतात त्यांना कोल्ड प्लाझ्मा म्हटले जाते. हे प्लाझ्मा कॅन्सरवरील उपचार, जखम भरण्यासाठी, दंतोपचारामध्ये प्रभावी ठरलेले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या