Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:35 IST
1 / 7थायलंडमध्ये आयोजित 'मिस युनिव्हर्स २०२५' सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनिका विश्वकर्मा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहेत. 2 / 7ऑगस्ट २०२५ मध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा ताज जिंकलेल्या राजस्थानच्या मनिकाने आपल्या एका खास लूकने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 3 / 7मनिका विश्वकर्मा यांनी बँकॉक येथील एका मिस युनिव्हर्स इव्हेंटदरम्यान अनारकली कुर्ता सेट परिधान केला होता.4 / 7त्यांनी घातलेला हा अनारकली सूट हेवी गोल्ड वर्क आणि सीक्विन डिटेलिंगने सजलेला होता. या पारंपारिक पोषाखावर त्यांनी नक्षीकाम केलेली मॅचिंग ओढणी घेतली होती.5 / 7या 'देसी' लूकमुळे मनिका यांनी केवळ भारतीय संस्कृतीची समृद्धता जगासमोर मांडली नाही, तर त्यांच्या फॅशनची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा होत आहे.6 / 7विवादग्रस्त ठरलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेचा समारोप २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. डेन्मार्कची विद्यमान मिस युनिव्हर्स २०२४ व्हिक्टोरिया थीलविग यावेळी विजेत्या सौंदर्यवतीला मुकुट परिधान करेल.7 / 7मनिका विश्वकर्मा यांनी आतापर्यंतच्या सर्व इव्हेंट्समध्ये आपल्या आकर्षक पेहरावाद्वारे भारताची समृद्ध सांस्कृतिक आणि वारसा अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे.