Petrol Diesel: भडका... भारताशेजारील 'या' देशात 50 रुपयांनी महागलं पेट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:57 IST
1 / 9देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेल महाग होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, देशात पेट्रोल स्वस्त झाले आहे. 2 / 9देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर अगदी एक रुपया प्रतिलीटरने कमी झाले आहेत. खरे तर, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.3 / 9याच दरम्यान, भारताशेजारी देश असलेल्या श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑईल स्थिती श्रीलंकेतील कंपनीने देशाला झटका दिला आहे. 4 / 9श्रीलंकन चलनाची मोठी घसरण झाल्याने येथील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. वाढ करण्यात आलेले दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होत आहेत. गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा कंपनीने दर वाढवले आहेत. 5 / 9लंका इंडियन ऑईल कंपनीने (एलआयओसी) झिझेलच्या किंमतीत 75 आणि पेट्रोलच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे, येथे डिझेल 254 रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोल 214 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. 6 / 9एलआयओसी कंपनीचे व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी म्हटले की, गेल्या 7 दिवसांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेतील चलन 57 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे, तेल आणि गॅस यांसारख्या वस्तूंवर त्याचा परिणाम झाला आहे. 7 / 9दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळेही पश्चिमी देशांनी रुसवर प्रतिबंध लादले आहेत. त्यामुळेही, कच्चे तेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे. 8 / 9दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाच, पेट्रोलचे दर 12 ते 16 रुपये प्रतिलीटरपर्यंत वाढतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते. मात्र, भारतात दर कमी झाल्याने ग्राहक खुश दिसत आहेत.9 / 9भारतातील मेट्रो शहरांमध्ये काहीही बदल नाही - मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या किंमतीत कसलाही बदल दिसून आला नाही. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये हा दर अनुक्रमे, 95.41, 104.67, 109.98, 91.43, आणि 101.40 रुपये प्रति लीटरवर जैसेथे आहेत.