शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paula Hurd: कोण आहे बिल गेट्स यांची सीरियस गर्लफ्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:59 IST

1 / 7
'आय अॅम लकी टू हॅव या सिरीयस गर्लफ्रेंड नेम्ड पॉला' - अशी कबुली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दिली आणि पॉला हर्ड यांची चर्चा अधिक बारकाईने सुरू झाली.
2 / 7
अनंत अंबानी यांच्या विवाहपूर्व सोहळ्यांना बिल गेट्स यांनी हजेरी लावली तेव्हा पॉला त्यांच्या सोबत होत्या. त्या दोघांचे भारतीय वेशातले फोटोही बिल यांनी तेव्हा शेअर केले होते.
3 / 7
मेलिंडा गेट्स यांच्याशी झालेला घटस्फोट ही आपल्या आयुष्यातली सर्वाधिक दुखरी जखम आहे, अशी कबुली दिल्यानंतर लगेचच बिल गेट्स यांनी पॉला यांच्यासोबतच्या सहजीवनाबद्दल भाष्य केले आहे हे विशेष.
4 / 7
आहेत कोण या पॉला हर्ड? ओरॅकल आणि हेवलेट पॅकर्ड या दोन बड्या कंपन्यांचे सीईओ म्हणून काम केलेल्या मार्क हर्ड यांच्या त्या पत्नी.
5 / 7
शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी घसघशीत देणग्या दिल्या आहेत. 'मार्क अँड पॉला हर्ड वेलकम सेंटर' आणि 'द हर्ड टेनिस सेंटर' ही या दानशूर दाम्पत्याने उभी केलेली दोन मोठी कामे.
6 / 7
मार्क हर्ड हे बेलर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी. या विद्यापीठात बास्केटबॉल पॅव्हिलियन उभारण्यासाठी अलीकडेच पॉला यांनी ७० लाख डॉलर्सची देणगी दिली आहे. २०२१ मध्ये बिल आणि मेलिंडा यांच्या घटस्फोटानंतर वर्षभरात बिल आणि पॉला हे जाहीर समारंभात एकत्र वावरताना दिसू लागले.
7 / 7
गेल्या वर्षी ऑलिम्पिकमधले महत्त्वाचे सामने पाहण्यासाठी बिल गेट्स त्यांची मुलगी कॅथरीन गेट्स आणि जावई नाईल नासर यांच्यासोबत पॅरिसला गेले, तेव्हा पॉला त्यांच्यासोबत होत्या. या सहचरीसोबतच्या आपल्या नात्याची जाहीर वाच्यता बिल यांनी प्रथमच केली आहे.
टॅग्स :Bill Gatesबिल गेटसInternationalआंतरराष्ट्रीयrelationshipरिलेशनशिप