६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:37 IST
1 / 10कतारची राजधानी दोहा येथे इस्रायल हल्ल्याविरोधात ६० हून अधिक मुस्लीम देश एकत्र आले, तिथे कुठलाही मोठा प्रस्ताव पारित झाला नाही. परंतु एक औपचारिक प्रस्ताव पारित झाला, ज्यात हल्ल्याचा निषेध करत गाझा येथील हल्ल्याची तुलना नरसंहार म्हणून करण्यात आली.2 / 10या बैठकीनंतर एक नवी चर्चा सुरू झाली आहे. जी मिस्त्र, पाकिस्तान आणि तुर्कीकडून सुरू आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील NATO च्या धर्तीवर इस्लामिक नाटो स्थापन करण्याची कल्पना इजिप्त आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून आली. या इस्लामिक नाटोचे मुख्यालय इजिप्तमध्ये बनवले जाऊ शकते असं इजिप्तने म्हटलं. 3 / 10त्यात इस्लामिक एकतेच्या नावाखाली एका अजेंड्यावर पाकिस्तान सातत्याने जोर देत आला आहे. त्यात इस्लामिक नाटोची संकल्पना मांडत पाकिस्तानने भारताविरोधात स्वत:च्या सुरक्षेची हमी मागितली आहे. पाकिस्तानकडून अधिकृत यावर भाष्य नाही परंतु इस्लामिक नाटो सारखी संघटना बनवण्याचे स्पष्ट संकेत आहेत. 4 / 10नाटोच्या नियमानुसार, जर त्यांच्या सदस्यांपैकी कुठल्याही देशावर हल्ला झाला तर सर्व देश मिळून विरोधी देशावर हल्ला करू शकतात. अशावेळी पाकिस्तान इस्लामिक नाटोबाबत पुढाकार घेत आहे. जेणेकरून भारताविरोधात संघर्षाची परिस्थिती उद्भवली तर दुसऱ्या मुस्लीम देशांचा पाठिंबा त्याला मिळू शकेल.5 / 10दोहा येथे ६० हून अधिक मुस्लीम देश एकटवले, तिथे इस्लामिक नाटोची संकल्पना पुढे आली. त्यात पाकिस्तानने पुढाकार घेतला. त्यामुळे जर इस्लामिक नाटोसारखी संघटना उभी राहिली तर भारतासाठी ही चिंतेची बाब आहे.6 / 10काश्मीर मुद्द्यांवरून भारताविरोधात पाकिस्तान कायम जागतिक व्यासपीठावर बोलत असतो, त्यात तुर्कीनेही अनेकदा पाकिस्तानला साथ दिली आहे. दोहा येथील इस्लामिक अरब समिटमध्येही तुर्कीने सहभाग नोंदवला होता. त्यामुळेच इस्लामिक नाटोच्या प्रस्तावाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.7 / 10दोहा येथील या समिटमध्ये पाकिस्तानकडून स्वत:ला आक्रमक म्हणून दाखवण्यात आले. पाकिस्तानी नेत्यांनी त्यांच्या देशाला इस्लामिक मुद्द्यांवरून नेतृत्व करणारा देश म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. कारण पाकिस्तान एकमेव इस्लामिक देश आहे, ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत. परंतु सध्या पाकची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.8 / 10सौदी अरब, कतार, युएई, तुर्की, इराणसारख्या मुस्लीम देशांच्या तुलनेत पाकिस्तानची स्थिती कमकुवत आहे. परंतु इस्लामच्या नावाखाली तो आक्रमक राहण्याचा दिखावा दाखवत आहे. पाकिस्तानने या बैठकीत इस्रायलविरोधात एक टास्क फोर्स बनवण्याचा प्रस्तावही पुढे आणला. 9 / 10दोहा येथील या बैठकीला पाकिस्तानकडून पंतप्रधान शहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इशाक डार सहभागी झाले होते. मुस्लीम देशांवर हल्ला करण्याची परवानगी इस्रायलला देता येणार नाही असं पाकिस्तानी मंत्री डार यांनी म्हटलं. जगातील १.८ अब्ज मुस्लीम लोकसंख्येचे लक्ष आजच्या समिटवर लागले आहे असंही पाकिस्तानने म्हटलं. 10 / 10पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकमधील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात नागरिकांवर हल्ले सुरू केले. परंतु भारताने पाकच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याचे एअरबेस, सैन्य तळांना टार्गेट करण्यात आले होते. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणखी चिघळला आहे.